राजकीय

शरद पवार म्हणाले, ‘गोपीचंद पडळकरांविषयी मला बोलायचे आहे, पण…’

टीम लय भारी

पुणे : शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सर्व थरांतून जोरदार टीका सुरू आहे. याबद्दल शरद पवारांची काय भावना आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. त्या पार्श्वभूमीवर ( Sharad Pawar on Gopichand Padalkar’s statement )पवार यांनी सुचक भावना व्यक्त केल्या आहेत

‘मला यावर बोलायचे आहे. पण नंतर कधीतरी बोलेन’ अशी प्रतिक्रया पवार यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात ‘कोरोना’वरील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पवार पुण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी पवारांना पडळकर यांच्या वक्तव्याबद्दल विचारणा केली. त्यावर पवारांनी ही सुचक प्रतिक्रिया व्यक्त केली.

पवार यांची ही प्रतिक्रिया फार सुचक असल्याचे बोलले जात आहे. काहीही न बोलता ते बरेच काही सांगून गेले आहेत. या प्रतिक्रियेमागे अनेक अर्थ दडल्याचे बोलले जात आहे.

शरद पवार यांच्यावर अनेकजण टीका करीत असतात. परंतु अशा टीका पवार खिलाडूवृत्तीने घेतला. मात्र गोपीचंद पडळकर यांनी केलेली टीका ‘आपण खिलाडूवृत्तीने घेतलेली नाही. याबद्दल आपण गंभीर आहोत’ असेच पवार यांनी सुचविले आहे ( Sharad Pawar has taken seriously to Gopichand Padalkar ).

हे सुद्धा वाचा

गोपीचंद पडळकरांची भूमिका ‘मोडेन पण वाकणार नाही’

Maharashtra Chief Secretary Name : शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी एकमताने मुख्य सचिव नियुक्तीचा घेतला निर्णय

गोपीचंद पडळकर – शरद पवार वादाच्या पार्श्वभूमीवर अनिल गोटेंचे भाजपवर खळबळजनक आरोप

गोपीचंद पडळकरांना फडणवीस, मुनगंटीवार यांच्याकडून कानपिचक्या

पवार यांना जे काही करायचे आहे ते कधीच बोलून दाखवत नाहीत, ते कृती करूनच दाखवतात. त्यामुळे पवार यांनी ‘मी नंतर कधी तरी बोलेन’ असे जे म्हटले आहे, तो पडळकर यांच्यासाठी मोठा इशारा असल्याचे दिसून येत आहे. पवार नंतर ‘कृतीतून’च बोलतील, अन् ‘बरेच काही’ करून दाखवतील असाच या वक्तव्यामागील अर्थ काढला जात आहे.

गोपीचंद पडळकरांना शरद पवार कदाचित माफ करतील, पण…

शरद पवार हे मोठ्या मनाचे राजकारणी आहेत. कदाचित ते गोपीचंद पडळकर यांना माफ करतील. पण पक्षाचे कार्यकर्ते त्यांना कधीही माफ करणार नाहीत. गोपीचंद पडळकरांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. राज्यभरातील आमचे कार्यकर्ते योग्य पद्धतीने त्यांचा निषेध करतील, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी व्यक्त केली आहे ( NCP won’t forgive to Gopichand Padakar ) .

पडळकरांचे अनेकदा डिपॉझिट जप्त झाले आहे

शरद पवार यांनी काल पुण्यात प्रतिक्रीया व्यक्त केल्यानंतर आज साताऱ्यातही पडळकरांना टोला हाणला. गोपीचंद पडळकरांना फार महत्व द्यायची गरज नाही. त्यांचे अनेकदा डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यांनी सांगलीत लोकसभा व बारामतीत विधानसभा निवडणूक लढविली होती. या दोन्ही ठिकाणी पडळकरांचे डिपॉझिट जप्त झाल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले. पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत.

गोपीचंद पडळकरांकडून राष्ट्रवादीला प्रती आव्हान

पडळकर यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. त्यांना बांगड्या घालू असे इशारे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहेत. परंतु गोपीचंद पडळकर मात्र बिनधास्तपणे फिरत आहेत. शुक्रवारी तर त्यांनी ६० – ७० वाहनांच्या ताफ्यासह आटपाडी व जत तालुक्यांतील अनेक गावे पिंजून काढली.

विजयी थाटात लोकांमधून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येत होते. मोकाटपणे रस्त्यावर फिरत असताना राष्ट्रवादीच्या कुणीही त्यांना आवरले नाही, किंवा किरकोळ विरोध सुद्धा केला नाही. गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेले हे प्रतीआव्हानच असल्याचे मानले जात आहे ( Gopichand Padalkar rechalleged to NCP ).

तुषार खरात

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

15 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

16 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

16 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

16 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

17 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

19 hours ago