राजकीय

राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे! प्रितीसंगमावर जाऊन फुंकले लढ्याचे रणशिंग

एखादी महत्वाची मोहिम सुरू करण्यासाठी गुरूपौर्णिमा हा चांगला दिवस असतो. म्हणून आज यशवंतरावांच्या स्मृतींना वंदन करून मी ही मोहिम सुरू केली. भाजपच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नातून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होता. सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न ही आमची अपेक्षा होती. ज्या प्रवृत्तींशी आमचा संघर्ष आहे, त्यांच्यासोबत गेले. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मी पुढाकार घेतला आहे. अजित पवार कुणी परके नव्हते, एकत्र काम केल्यानंतरही मतभिन्नता असते. त्यामुळे त्यांच्याविषयी संशय व्यक्त करणार नाही. असे प्रांजळ मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे व्यक्त केले.

माजी मुख्यमंत्री आणि गुरु असलेल्या यशवंतराव चव्हाण यांची समाधी असलेल्या प्रितीसंगमावर जाऊन शरद पवार यांनी पुन्हा एकदा लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. त्यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. त्यांची पहिली सभा जुन्नरमध्ये होणार आहे. ही पहिली सभा अजित पवारांसोबत जाऊन धक्का दिलेल्या माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात होणार आहे. त्यानंतर बीडमधील परळीला मुंडेंच्या मतदारसंघात दुसरी सभा होणार आहे. दरम्यान, काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला असल्यास संख्याबळाचा विचार करता तर उचित असल्याचेही ते म्हणाले.

अजित पवार कुणी परके नव्हते, एकत्र काम केल्यानंतरही मतभिन्नता असते. त्यामुळे त्यांच्याविषयी संशय व्यक्त करणार नाही, असेही पवार यांनी नमूद केले. कोणताही संभ्रम नको, जाहीरपणे पक्षबांधणीसाठी जात असल्याचे शरद पवार यांनी ठामपणे सांगितले. ते पुढे म्हणाले की, आमचे अनेक सहकारी ज्यांना हजारो कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला, ज्यांच्याकडून संघटन मजबूत करावी अशी अपेक्षा होती. मात्र काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे नव्या पिढीतील कार्यकर्ता नाऊमेद होऊ नये म्हणून मी हा दौऱा सुरू केला आहे. कार्यकर्ते आणि त्यातीलही 70-80 टक्के तरूण आमच्या पाठीशी आहेत, हे चित्र आहे. आम्ही कष्ट केले, या तरूणांना दिशा दिल्यास मला खात्री आहे दोन ते तीन महिन्यांत संपूर्ण महाराष्ट्रातील चित्र राष्ट्रवादीला अनुकुल होईल.

हे सुध्दा वाचा:

प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांना पक्षातून हाकलले; पवारांनी सोडले ब्रह्मास्त्र

मनसेच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचा सूर उमटला; शिवसेना भवनासमोर लागले पोस्टर

शिर्डी, अक्कलकोटसह विविध मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

शरद पवार म्हणाले की, एखादी महत्वाची मोहिम सुरू करण्यासाठी गुरूपौर्णिमा हा चांगला दिवस असतो. म्हणून आज यशवंतरावांच्या स्मृतींना वंदन करून मी ही मोहिम सुरू केली. भाजपच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नातून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होता. सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न ही आमची अपेक्षा होती. ज्या प्रवृत्तींशी आमचा संघर्ष आहे, त्यांच्यासोबत गेले. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मी पुढाकार घेतला आहे. अजित पवार कुणी परके नव्हते, एकत्र काम केल्यानंतरही मतभिन्नता असते. त्यामुळे त्यांच्याविषयी संशय व्यक्त करणार नाही. ज्यांना एवढं समजत नाही की मी जाहीरपणानं पक्षाच्या बांधणीसाठी निघालो आहे, त्यावरून संभ्रम निर्माण करू नका. महाराष्ट्राच्या विधानसभेत राष्ट्रवादीनं ज्यांना पक्षाचं नेतृत्व दिलं ते जयंत पाटील आहेत. त्यामुळे नेत्यांनी एखादा निर्णय घेतला असले, पत्रव्यवहार केला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. अडीच वर्षं आम्ही शिवसेनेबरोबर काम केलं तेव्हा त्यांना वाटलं नाही की आम्ही काही चूक करत आहोत. असेही शरद पवार यांनी सांगितले.

विवेक कांबळे

Recent Posts

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

21 mins ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

1 hour ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

1 hour ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

2 hours ago

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

4 hours ago

Sanjaymama Shinde यांच्या नावाने माढ्यातील ३६ गावांतील जनताही बोंब मारते | Vidhansabha 2024

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

4 hours ago