लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार सत्तेवर येईल अशी चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटणार आहेत.
तिन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांमध्ये सत्ता वाटपाच्या फॉर्म्यूल्यावर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. राज्यातील नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेची माहिती सोनिया गांधी यांना देऊन तिन्ही पक्षांच्या संभाव्य सरकारला हिरवा कंदिल मिळविण्याबाबत पवार उद्या प्रयत्न करतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पारंपरिक मित्र पक्ष आहेत. त्यामुळे शिवसेनेसोबत जाताना या दोन्ही पक्षांनी एकमेकांना विश्वासात घेऊनच पुढची पाऊले टाकली आहेत. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करताना सत्तेचा वाटा काँग्रेस व राष्ट्रवादीलाही व्यवस्थितपणे मिळू शकेल, याची काळजी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतली आहे. शिवसेना हा हिंदूत्ववादी पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत गेल्यानंतर त्याचे समर्थन करण्याबाबतही काँग्रेस व राष्ट्रवादीने आपली व्यूहनिती निश्चित केली आहे.
उद्या दुपारी चार वाजता सोनिया गांधी व शरद पवार यांच्यात ही बैठक होत आहे. सत्ता स्थापनेपूर्वीची ही शेवटची व महत्वाची बैठक असेल. या बैठकीत राज्यातील सरकार स्थापनेचा अंतिम फैसला होईल, असेही या सूत्रांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा
आमदार रोहित पवारांनी अधिकाऱ्यांसोबत घेतली दहा तासांची बैठक
देवेंद्र फडणवीस ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी आहेत, हे मला आताच कळलं; शरद पवारांचा टोला
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…