राजकीय

त्यांचं नाणं चालणार नाही; शरद पवार यांचा अजित पवारांना टोला

जे माझा फोटो लावतात, त्यांना माहिती आहे की त्यांचं नाणं चालणार नाही असा टोला शरद पवारांनी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर केला. मला पांडूरंग म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं सांगायचं असा कार्यक्रम काहींनी सुरू केल्याचं ते म्हणाले. आज अनेकांनी वेगळी भूमिका घेतली, त्याबद्दल माझं काही मत नाही, पण पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी निवडून दिलं त्यांना विश्वासात न घेता वेगळी भूमिका घेतली गेली असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. त्यामुळे येत्या काळात अंगावर तेल चोपटलेला पैलवान आपल्या पुतण्याला आसमान दाखवणार ही बाब समोर येत आहे.

मध्य प्रदेशमधील सभेमध्ये पंतप्रधानांनी राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी म्हटलं, पण दोन दिवसांपूर्वी झालेल्या शपथविधीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कशी शपथ दिली असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर केला, विरोधकांना एकत्रित करण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे पंतप्रधान अस्वस्थ झाल्याचंही ते म्हणाले. आज राष्ट्रवादीच्या स्थापनेला 24 वर्षे पूर्ण झाली, या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रवादीची फळी तयार केली. यामध्ये अनेकजण आमदार, खासदार आणि मंत्री झाले. राष्ट्रवादीने अनेक नवीन नेते तयार केले.

या नेत्यांना तयार करताना त्यांना महाराष्ट्राचा चेहरा बनवायचा होता, राज्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत कसं पोहोचायचं हा विचार होता, असेही शरद पवार यांनी सांगत कार्यकर्त्यांना भावनिक केले. आज आपल्यासमोर संकटे आहेत, ज्यांचे विचार देशाच्या हिताचे नाहीत त्यांच्या हातात आज देशाची सूत्रे आहेत. केंद्रामध्ये मी अनेकांच्या मंत्रिमंडळात काम केलं. लोकशाहीमध्ये विरोधी असो वा सहकारी असोत, त्यांच्यात सुसंवाद असावा लागतो. जो काही निर्णय घेतला जातो त्यावर सर्वसमान्यांची प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घ्यावं लागतं. आज देशामध्ये हा संवाद नाही, असेही
शरद पवार म्हणाले म्हणाले.

हे सुद्धा वाचा

वय 82 झालं, कधी थांबणार आहात की नाही? अजित पवार यांचा शरद पवारांना सवाल

अजित पवारांना व्हायचेय मुख्यमंत्री; कावळा बसायची आणि फांदी तुटायची वाट भाजपा पाहतेय

प्रतिभाताई पवार आत्मचरित्र लिहितील का ?  

देशातील विरोधक एकत्र येत असताना ज्यांच्या हातात सत्ता आहे ते अस्वस्थ होताना दिसत आहेत असं शरद पवार म्हणाले. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी सांगितलं की राष्ट्रवादीने 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला. एकदा पंतप्रधान बारामतीत आले होते, त्यावेळी ते म्हणाले की पवार साहेबांचे बोट धरून मी राजकारणात आलो. त्यानंतरच्या निवडणुकीत राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.

विवेक कांबळे

Recent Posts

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

14 mins ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

34 mins ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

38 mins ago

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

3 hours ago

Sanjaymama Shinde यांच्या नावाने माढ्यातील ३६ गावांतील जनताही बोंब मारते | Vidhansabha 2024

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

3 hours ago

अजित पवार पळपुटे | शरद पवारांचा वारसा सुप्रिया सुळे, रोहित पवार चालवतील | Sanjaymama Shinde

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Sharad Pawar's legacy will be run…

3 hours ago