राजकीय

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची मोदी सरकारची घोषणा होती, त्याचे काय झाले? शिवसेनेचा सवाल

टीम लय भारी

मुंबई : दिल्लीच्या सीमेवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर संपलं आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या, तर काही मागण्यांबाबत सरकारकडून लेखी आश्वासन घेतलं आणि त्यानंतरच आंदोलनाची सांगता झाल्याचं जाहीर केलं. एकीकडे हे शेतकरी माघारी परतत असताना दुसरीकडे देशभरात विरोधकांकडून या मुद्द्यावर बोट ठेवलं जात आहे. शिवसेनेनं या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची मोदी सरकारची घोषणा होती, त्याचे काय झाले? असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे. सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारच्या कृषीविषयक धोरणांवर टीका करण्यात आली आहे(Shivsena questioned, what about doubling of farmers income?).

“मोदी सरकारने तर आंदोलनकर्त्यांना मूर्खच ठरवलं होतं”

कृषी कायदे मागे घेण्यासोबतच शेतकऱ्यांच्या इतरही मागण्या केंद्र सरकारला मान्य कराव्या लागल्यानंतर शेतकरी माघारी परतले. यावर अग्रलेखात निशाणा साधण्यात आला आहे. “शेतजमिनीचे कंत्राटीकरण, बाजार समित्या, मंड्यांवर उद्योगपतींचे वर्चस्व आणणारे तीन कायदे शेतकऱ्यांनी झुगारून दिले. मोदी सरकारने तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आधी मूर्खच ठरवले. कायदे त्यांच्या हितासाठी आहेत, शेतकऱ्यांना ते कळत नाही, असा प्रचार केला. सरकारने अधिकृतपणे शेतकऱ्यांना खलिस्तानी अतिरेकी ठरवून बदनाम केले”, असं यात म्हटलं आहे.

टोमॅटो शंभरीपार, शिवसेनेनं करुन दिली, बहोत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार’ची आठवण!

संजय राऊतांचे UPA मध्ये सहभागी होण्याचे संकेत

 ..म्हणून सरकारने माघार घेतली!

दरम्यान, निवडणुकांमधील पराभवाच्या भितीमुळेच सरकारने माघार घेतल्याचं अग्रलेखात नमूद केलं आहे. “सरकारने आधी आडमुठेपणा केला त्यामागे मर्जीतल्या उद्योगपतींचं हित होतं. आता अचानक माघार घेतली त्यामागे पंजाब, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमधल्या निवडणुकांत पराभव होईल अशी भिती आहे. शेतकऱ्यांनी मनात आणलं तर केंद्रातलं सरकार ते उलथवून टाकतील या भयातून हे केलं”, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

लोकमान्य टिळकांचं ‘ते’ वाक्य कंगनाला तंतोतंत लागू पडतं; शिवसेनेचा टोला

Shiv Sena’s Sanjay Raut raises doubts over Gen Bipin Rawat’s death

 “…त्यामुळे भाजपाचे काहीच चालले नाही”

“कायदे मागे घेणार नाही यावर सरकार ठाम होते. पण शेतकऱ्यांचा रेटा आणि जगभरातील मानवतावाद्यांचा दबाव यामुळे सरकारला कायदे मागे घ्यावे लागले. शेतकरी मरणाला घाबरले नाहीत आणि आंदोलनात फूट पडू दिली नाही. त्यामुळे भाजपाचे काहीच चाचले नाही. सरकारने देशातील सार्वजनिक उद्योग, उपक्रम संपवले आणि उद्योगपतींना विकले. तसे धोरण ते शेतीच्या बाबतीत राबवू पाहात होते. याला सुधारणावादी पाऊल म्हणता येणार नाही”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

Team Lay Bhari

Share
Published by
Team Lay Bhari

Recent Posts

पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान

पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…

11 mins ago

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

1 hour ago

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

2 hours ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

2 hours ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

3 hours ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

3 hours ago