राजकीय

श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी…सुनेत्रा पवारांनी अजित पवारांना दिली श्रीकृष्णाची उपमा

बारामती मतदारसंघाबाबत अजूनही सस्पेन्स कायम असताना सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) यांची एक फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये सुनेत्रा पवार यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांनी श्रीकृष्णाची उपमा दिली आहे. त्यांच्या या फेसबुक पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. संभाव्य लोकसभा उमेदवार असणाऱ्या सुनेत्रा पवार सध्या बारामती मतदारसंघ पिंजून काढत आहेत.(Sunetra Pawar Face Book Post Viral She Compares Ajit Pawar With Lord Krishna)

अजित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत बारामतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं. बारामतीचा सस्पेन्स थोडा राहू दे, तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव असणार आहे असं अजित पवारांनी म्हटलं आहे. अशातच सुनेत्रा पवार यांच्या फेसबुक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

आपण सारे जण दादांचे भाऊ आहोत, श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच. असं विधान सुनेत्रा पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये केलं आहे.

काय आहे फेसबुक पोस्ट?

सारोळ्यात सगळेच एकवटले..!

अवघ्या काही दिवसात आज पुन्हा सहाव्यांदा भोर वेल्हे मुळशी विधानसभा मतदार संघात सदिच्छा भेटीसाठी दखल झाले.
सारोळा येथून या भेटींचा प्रारंभ करताना सर्वप्रथम वंदन केले ते छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यानंतर झालेल्या सदिच्छा भेटीत महायुतीतील सर्वच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले.

महायुतीतील इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विकासकामाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पक्षीय राजकारणा पलिकडचे, व्यापक हिताचे अनुभव सांगितले. जनतेला २४ तास भेटणारे दादा आहेत, कधीही फोन केला तर त्याला प्रतिसाद देणारे दादा आहेत, आपण सारे जण दादांचे भाऊ आहोत, श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच. अशा अनेक भावना सर्वांकडून पोटतिडकीने व्यक्त होत होत्या. त्या भावनातून लोकसभा निवडणुकीतील विजयाचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी त्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची दखल मी घेतली असून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी कोणतीही कसूर ठेवणार नाही. ज्या ठिकाणी ही सदिच्छा भेट झाली ते ठिकाण पाहून मला माझ्या आजोळची आठवण झाली. त्या अर्थाने आजोळातून मिळणारे प्रेम मला सारोळा येथे मिळणार याची खात्री येथील एकजुटीने मिळाली.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, शिवसेना तालकाप्रमुख अमोल पांगारे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष सुनिल गायकवाड, भालचंद्र जगताप, रणजीत शिवतरे, चंद्रकांत बाठे, विक्रम खुटवड, बाळासाहेब गरुड, विद्याताई पांगारे, नीलम झांजले, अर्जुनराव अहिरे, गणेश निगडे, महेंद्र भोरडे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांचे मनापासून आभार.

धनश्री ओतारी

Recent Posts

नाशिक इंदिरानगर येथे वॉशिंग मशिनमध्ये ठेवलेले दागिन्यांची चोरी

इंदिरानगरमध्ये (Indiranagar) चोरट्याने चक्क वॉशिंग मशिनमध्ये (washing machine) लपवून ठेवलेले सुमारे दीड लाखांचे दागिने (Jewellery…

15 mins ago

३० मेपर्यंत खोदलेले रस्ते दुरुस्ती न झाल्यास महापालिका नेमकी कोणावर कारवाई करणार?

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून (MNGL) घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरवण्याच्या प्रकल्पासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदले (roads…

47 mins ago

दीड लाखांची लाच घेताना पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात

राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक (State Director of Archaeology) संशयित डॉ. तेजस मदन गर्गे…

1 hour ago

100 कोटींच्या TDR घोटाळा अहवालात दडलय काय? 2 वर्षे उलटूनही गुप्तता कायम

महापालिका हद्दीतील व देवळाली शिवारातील टीडीआर (TDR) घोटाळ्याचा तपास केल्यानंतर महापालिकेने त्याचा गोपनीय अहवाल दोन…

2 hours ago

उबाठा गटाच्या विलिनीकरणाबाबत मनीषा कायंदे म्हणाल्या, शरद पवारांच्या विधानानंतर…

वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरु यांच्या विचाराचे आहोत. काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही. यामुळे अनेक प्रादेशिक…

2 hours ago

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

13 hours ago