राजकीय

Supreme Court : ठाकरे गटाच्या वकीलांकडून शिंदेगटाची कोंडी!

राज्यातील सत्तांतराच्या नाट्यात शिवसेनेचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. आताच्या घडीला शिवसेना नेमकी कोणाची हा वाद शमणारा नाही त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटाने थेट सर्वोच्च न्यायालय गाठले आहेत. दोन्ही गटाकडून देशातील तगड्या वकीलांची फळी कामाला लावली असून आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून करण्यात येत आहे. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवले असून तारीख पे तारीख नंतर आज याप्रकरणी महत्त्वाची सुनावणी घेण्यात येत आहे. सुनावणीच्या वेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी यावेळी ठाकरेंचा बालेकिल्ला चांगलाच लढवला असून कायद्याचा अक्षरशः कीस काढत शिंदे गटाला फैलावर घेतले.

सर्वोच्च न्यायालयात राज्यात शिवसेनेवरून चिघळलेल्या वादावर आज सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी कायद्याच्या आधारे शिंदे गटाला चांगलेच कोंडीत पकडल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अभिषेक मनु सिंघवी यांनी यावेळी पक्षांतराचा मुद्दा पटलावर ठेवत म्हणाले, परिशिष्टानुसार पक्षातून बाहेर पडणाऱ्यांसाठी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी विलीनीकरण हाच एकमेव बचावाचा पर्याय आहे. त्यामुळे शिंदे गटाला ही कारवाई टाळायची असल्यास त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन होणे, हाच पर्याय उरतो असे म्हणून त्यांनी शिंदे गटापुढे आता नेमका कोणता पर्याय म्हणून त्यांनी यावेळी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा…

Navratri 2022 : खळबळजनक! नवरात्रीनिमित्त खरेदी केलेल्या उपवासाच्या पदार्थातून विषबाधा

Women Singer Allegation : ‘स्वत:च्या सुरक्षारक्षकाने मला नग्नावस्थेत पाहिलेले’ गायिकेने केलाय धक्कादायक खुलासा

ठाकरे गटाची बाजू मांडताना अभिषेक मनु सिंघवी पुढे म्हणतात, जर पक्षात विलिनीकरण होत असेल तर अपात्रतेचा निकष लागू होत नाही. शिंदे गट दुसऱ्या पक्षात विलीन झाल्यानंतरच निवडणूक आयोगाला बहुमताचा निर्णय घेता येऊ शकतो. पण निवडणूक आयोग ज्या व्यक्तीची ओळखच निश्चित नाही, त्याची तक्रार कशी काय दाखल करून घेऊ शकतो, हा माझा प्रश्न आहे. जो गट उद्या अपात्र ठरणार आहे, तो बहुमताचा भाग होऊ शकतो का? हे म्हणजे घोड्यापुढे टांगा लावण्यासारखे आहे. त्यामुळे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय अपात्रतेसंदर्भात निकाल देत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाला वाट पाहण्यास काय हरकत आहे, असे म्हणून अॅड. सिंघवी यांनी निवडणूक आयोगाला सुद्धा धारेवर धरले आहे.

सिंघवी यांनी मांडलेल्या मुद्यावर घटनापीठाने सुद्दा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. घटनापीठ म्हणते, अपात्रतेचा मुद्दा सभागृहाशी संबंधित आहे, तर निवडणूक आयोगाचा अधिकार कोण पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहे हे ठरवण्याचा आहे असे म्हणून घटापीठाकडून महत्त्वाची यावेळी टिप्पणी करण्यात आली. घटनापीठाने अशी भूमिका घेतल्याने शिवसेनेच्या चिन्हाबाबतच्या निर्णयात न्यायालय निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचे अधिकार देणार का हे पाहणेच आता महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान कपिल सिब्बल यांनी सुद्दा ठाकरे गटाची खिंड उत्तमप्रकारे लढवत त्यांनी पुन्हा एकदा 20 जूनपासून महाराष्ट्रात घडलेल्या एकूण राजकीय घडामोडींचा आढावा घेतला, त्यामध्ये त्यांनी विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्र ठरवलेल्या आमदारांचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला. यावेळी बोलताना शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यापूर्वी महाराष्ट्रात बऱ्याच राजकीय घडामोडी घडून गेल्या आहेत, त्यामुळे प्रथम आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय झाला पाहिजे असे सिब्बल यांच्याकडून सांगण्यात आले.

यावेळी एकनाथ शिंदे हे कोणत्या अधिकाराने शिवसेनेचे चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे गेले, ते शिवसेनेचे सदस्य म्हणून की आमदार म्हणून निवडणूक आयोगाकडे गेले होते असे सवाल घटनापीठाने शिंदेगटाला केले. याच मुद्याला पकडत कपील सिब्बल म्हणाले, हाच मूळ मुद्दा आहे. प्रथम एकनाथ शिंदे हे कोणत्या अधिकारात निवडणूक आयोगाकडे गेले होते, हे स्पष्ट झाले पाहिजे. याच प्रश्नावर घटनापीठ लगेचच उत्तरले की एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सदस्य असल्यास निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात.

न्यायालयात शिवसेनेच्या या जटील वादाच्या वेगवेगळ्या मुद्यावरून दोन्ही गटाच्या नेत्यांकडून आपापली पाठराखण केली जात असली तरीही घटनापीठ या प्रकरणी नेमका काय निकाल देणार, कोणाच्या बाजूने कौल मिळणार आणि कोणाची कोंडी होणार हे पाहणेच महत्त्वाचे ठरणार आहे कारण दोन्ही गटाच्या अस्तित्वाचा हा प्रश्न निर्माण झाल्याने लढाई अटीतटीची दिसून येत आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

14 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

14 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

15 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

15 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

15 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

17 hours ago