राजकीय

Swabhimani : स्वाभिमानीचे ‘आत्मक्लेश जागर’ आंदोलन

टीम लय भारी

कोल्हापूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच केंद्र सरकारला सुबुध्दी येऊ दे, या मागणीसाठी स्वाभिमानी  (Swabhimani) शेतकरी संघटनेच्या वतीने ‘आत्मक्लेश जागर’ आंदोलन करण्यात येणार आहे.

गुरुवार ३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसमवेत रात्रभर ‘आत्मक्लेश जागर’ आंदोलन करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, “केंद्र सरकारने देशातील शेतक-यांवर तीन कृषी कायदे लादले आहेत. हे कायदे अन्यायी असून शेतक-यांना उद्ध्वस्त करणारे आहेत. दिल्लीत ७ दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत देशभरातील शेतकरी कुडकुडीत बसले आहेत. तरीही केंद्र सरकार केवळ वेळकाढूची भूमिका घेत आहेत.

त्या शेतक-यांना पाठिंबा म्हणून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे जागर आंदोलन करण्यात येणार आहे. रात्री पिठलं-भाकरं खाऊन या आंदोलनाला सुरूवात केली जाणार आहे. रात्रभर भजन आणि किर्तन केलं जाणार आहे. केंद्र सरकारला सुबुध्दी दे व शेतक-यांना न्याय मिळू दे या मागणीसाठी आत्मक्लेश जागर आंदोलन केले जाणार असून रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जागर होणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.

अभिषेक सावंत

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

5 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

6 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

6 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

1 week ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

1 week ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

1 week ago