राजकीय

देशभरातील हवा बदलली, ४ जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार: शशी थरुर

लोकसभेची ही निवडणूक (Lok sabha election) साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष आहे. भाजपाने लोकशाही, संविधान धोक्यात आणले आहे, विविधतेला खुलेआमपणे छेद दिला आहे. तीन टप्प्यातील मतदान झाले असून दक्षिण भारतातच नाही तर सर्वच राज्यात हवा बदललेली दिसत आहे. ४ जूनला दिल्लीतून भारतीय जनता पक्षाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार( India aghadi government to come) येईल, असा विश्वास काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी व्यक्त केला आहे.(The air across the country has changed, on June 4, the BJP government will come to power: Shashi Tharoor)

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना शशी थरुर (Shashi Tharoor) पुढे म्हणाले की, जात, धर्म, भाषा, प्रांत कोणताही असो सर्वप्रथम आपण भारताचे नागरिक आहोत असे संविधानाने स्पष्ट केले आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचा विचार तसा नाही. भाजपाने नागरिकता मध्ये धर्म आणला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीरपणे जे शब्द वापरत आहेत ते शब्द आपण बंद घरातही वापरू शकत नाही, हे अत्यंत लांछनास्पद असून देश आणि राजकारणातही ते योग्य नाही. भाजपाचे राजकारण पाहता सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढाईत भाग घेतला आहे. ४ जूननंतर खऱ्या अर्थाने सर्व जाती धर्माचा विकास करणारे व सर्वांना सोबत घेऊन जाणारे सरकार येईल.

निवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनता पक्ष बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न यांच्यावर बोलत नाही. जनतेचे ज्वलंत प्रश्न टाळून गैरमहत्वाच्या मुद्द्यावरच भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चर्चेचे खुले आव्हान दिले आहे पण मोदींनी ते स्विकारले नाही. युपीए सरकार असताना डॉ. मनमोहनसिंह हे नेहमी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र आता स्क्रिप्टेड मुलाखती देत आहेत.

महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी योग्य समन्वय असून सर्व पक्ष एकत्र येऊन प्रचार करत आहेत. भाजपाने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले असले तरी कार्यकर्ते मात्र मुळ पक्षाबरोबच आहेत. मविआ- इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये समन्वय आहे तसा समन्वय एनडीएमध्ये मात्र दिसत नाही, असेही शरी थरूर (Shashi Tharoor) म्हणाले.

या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, विधान सभेतील उपनेते आमीन पटेल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया समन्वयक प्रगती अहिर, प्रदेश प्रवक्ते भरतसिंह आदी उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अनिस अहमद इद्रिसी यांनी काँग्रेस पक्षात केला.

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

2 days ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago