राजकीय

शिर्डीतून उमेदवारी द्यायला भाजपा तयार होती,पण शिंदे गट…; रामदास आठवलेंचे मोठे विधान

माझ्या नावात आहे राम, तरी माझे आहे बौद्ध धर्माचे काम, अशा ओळी म्हणत, आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहोत. सर्वधर्मसमभावाची आमची भूमिका आहे. अखंड भारताची कल्पना पुढे नेली पाहिजे, असे सांगत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीचे जागावाटप, उमेदवारी मिळण्याबाबतच्या मावळलेल्या आशा आणि मित्रपक्ष म्हणून असलेली भूमिका यावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले जागावाटपाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक झाली. बारामतीचा तिढा सुटल्यानंतर आता नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग तसेच अन्य मतदारसंघांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडेतीन तास बैठक पार पडली. काय ठरले की ठरले नाही, हे गुलदस्त्यातच आहे.(The BJP was ready to field a candidate from Shirdi,but the Shinde faction…; Ramdas Athawale’s big statement)

तसेच मनसेच्या महायुतीमधील सहभागाबाबत अद्यापही चर्चा होताना दिसत आहेत. यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रा तून एकतरी जागा मिळावी, असा आग्रह धरला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात रामदास आठवले यांनी मोठे विधान केले.शिर्डीतून उमेदवारी द्यायला भाजपा तयार होती, पण…
शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डीतून माझा पराभव झाला होता. या लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस शिर्डीतून उमेदवारी द्यायला तयार होते.इतकेच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीची जागा मिळावी म्हणून प्रयत्न केले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचण असल्याने उमेदवारी मिळाली नाही, असे रामदास आठवले म्हणाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आरपीआयला किमान एक जागा मिळावी असा आमचा आग्रह होता. परंतु, तसे घडले नाही.
असे असले तरी देवेंद्र फडणवीसांनी काही आश्वासने दिली आहेत, असे रामदास आठवले म्हणाले. दरम्यान, या देशाचे संविधान कुणीही बदलू शकत नाही. संविधान बदलणार या फक्त अफवा पसरवल्या जातात. मी मंत्रिमंडळात आहे, संविधानाला हात लावू देणार नाही, असा निर्धार व्यक्त करत, मागच्या दहा वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांची कामे पूर्ण केली आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील स्मारकासाठी १२०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, अशी माहिती
रामदास आठवले यांनी दिली.दहा वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांची कामे पूर्ण केली आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील स्मारकासाठी १२०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, अशी माहिती
रामदास आठवले यांनी दिली.

टीम लय भारी

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

12 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

13 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

15 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

15 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

16 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

16 hours ago