राजकीय

मराठा आरक्षणाची मर्यादा शिथील करावी; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट त्यांच्या शासकीय निवासस्थानी घेतली. या भेटीस उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. मोदींसोबत व्यवस्थित चर्चा झाली असून त्यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले आहेत. मराठा आरक्षणाची मर्यादा शिथील करावी अशी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे मागणी केली (Uddhav Thackeray demanded that the limits of Maratha reservation should be relaxed).

राज्याचे जे विषय मांडले आहेत त्याची माहिती घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले आहे असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले आहे. जे विषय मांडले आहेत ते सकारात्मक पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सोडवतील असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Prime Minister Narendra Modi) भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र सदनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाणही यावेळी उपस्थित होते.

केंद्राच्या अखेरच्या इशाऱ्याला ट्विटरने दिला सकारात्मक प्रतिसाद!

पेट्रोल-डिझेलची भाववाढ मागे घ्या नाहीतर मोठे आंदोलन करु, पटोलेंचा इशारा

Data protection bill: Union IT minister retracts comments after panel members protest

उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधानांसमोर राज्यातील संवेदनशील विषय मांडले असल्याची माहिती दिली. मराठा आरक्षण (Maratha reservation), इतर मागासवर्ग आरक्षण, मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा विषय, जीएसटीचा परतावा, शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत प्रश्न, पीक विमा, चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी, मराठा भाषेला अभिजात दर्जा आणि वादळग्रस्तांना मदतीचे निकष याबद्दल मोदींशी चर्चा झाल्याचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावेळी सांगितले.

अशोक चव्हाण यांनी यावेळी नरेंद्र मोदींसमोर मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा मांडला असल्याची माहिती दिली. मराठा आरक्षणातील (Maratha reservation) सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातील महत्वाचे मुद्दे मोदींच्या निदर्शनास आणून दिले असे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले. “आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करावी, अन्यथा राज्यांना अधिकार देऊनही आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार नाही,” अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. तसा युक्तिवाद सुप्रीम कोर्टात झाला पाहिजे असे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले.

तुमच्याकडे अधिकार असताना निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी विनंती मोदींना करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. मराठा असो किंवा ओबीसी आरक्षण असो घटनादुरुस्ती किंवा कायदेशीर मार्ग असतील सकारात्मक भूमिका घ्यावी असे सांगितले असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

“महाराष्ट्राला २४ हजार ३०६ कोटी जीसएटी भरपाई मिळणे बाकी आहे. कोरोनाचे संकट सर्वांवर असून आर्थिक दिलासा देण्यासाठी हे पैसे लवकर मिळाले तर फायदा होईल,” असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. वादळाचा फटका बसल्यानंतर मदतीचे निकष बदलण्याची गरजही यावेळी मोदींकडे बोलून दाखवण्यात आली. २०१५ चे नियम आपण बदलण्याची गरज असल्याचे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. तसेच १४ व्या वित्त आयोगातील थकीत १ हजार ४४ कोटींचा निधी तात्काळ मिळावी अशी मागणी केल्याचे अजित पवारांनी सांगितले.

Rasika Jadhav

Recent Posts

पावसाळ्यानंतर त्वचासंबंधी या समस्या वाढू शकतात, जाणून घ्या

सप्टेंबर महिना संपत आला असून, आता पावसाळादेखील संपलाच आहे. पावसाळा संपल्यानांतर हवामानात बदल होते. या…

2 hours ago

‘विराट कोहलीने भेट दिलेल्या बॅटने मी कधीही खेळणार नाही’: आकाशदीप

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना भारतने जिंकला…

3 hours ago

कानपूरमध्ये इतिहास रचणार विराट कोहली! सचिन तेंडुलकरच्या क्लबमध्ये होणार सामील

भारत आणि बांगलादेशमध्ये दुसरा कसोटी सामना 27 सेप्टेंबरला खेळला जाणार आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन…

4 hours ago

‘पुष्पा 2’ ची नवीन रिलीज डेट जाहीर, या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आपल्या धमाकेदार चित्रपटासाठी ओळखला जातो. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर…

5 hours ago

‘खतरों के खिलाडी 14’ ग्रँड फिनालेमध्ये होणार आलिया भट्टची एंट्री

कलर्स टीव्हीचा प्रसिद्ध शो 'खतरों के खिलाडी 14' त्याच्या फिनाले जवळ आला आहे. या शोचे होस्ट…

5 hours ago

मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी दररोज करा ‘हे’ सोपे व्यायाम

आजकल सर्वनाचा सुंदर आणि फिट दिसायला आवडते. त्यासाठी लॉग योग, व्यायाम आणि जिम सुद्धा लावतात.…

6 hours ago