Categories: राजकीय

पुढच्या महिन्यात राज्यातील ‘मुख्य’ खुर्ची बदलणार; विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा दावा

अजित पवार यांना भाजपने सत्तेत सामावून घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची डळमळीत झाल्याची चर्चा राज्यात होती. पण उपमुख्यमंत्री तसेच या खुर्चीचे प्रबळ दावेदार असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी ही शक्यता फेटाळून लावली. असे असताना येत्या १५ ते २० दिवसांत महाराष्ट्रात मोठे बदल होती. त्यामध्ये ‘मुख्य’ खुर्चीपासून बदलाला सुरुवात होईल, असे मी खात्रीने आणि ठासून सांगतो, असा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार यांच्या या दाव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पद धोक्यात आले आहे. या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री बदलेले जाणार अशी चर्चा आहे. विशेषतः अधिवेशनाच्या काळात त्या चर्चेचा जोर होता. मात्र, त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हेच राहतील’, असे स्पष्ट केले होते. त्यावेळी शांत झालेल्या चर्चेला वडेट्टीवार यांच्या दाव्यामुळे तोंड फुटले आहे.

आगामी १५ ते २० दिवसांत महाराष्ट्रात काय बदल होतील, ते राज्यातील जनता नक्कीच बघेल. त्यामध्ये ‘मुख्य’ खुर्चीपासून बदलाला सुरुवात होईल, असे मी खात्रीने सांगतो. सप्टेंबर महिना हा सत्ता बदलाचा आहे. सत्ताबदल म्हणजे आमची (महाविकास आघाडी) सत्ता येईल, असे आम्ही म्हणत नाही. पण, मुख्य खुर्ची मात्र नक्की बदलेल, हे मी ठासून सांगतो. असे विजय वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार यांच्या दाव्यात तथ्य आहे ते यासाठी की, सत्ता बदल झाल्यानंतरही राज्यातील जनतेच्या मनात एकनाथ शिंदे जागा करू शकले नाहीत. ही बाब भाजपच्या वरिष्ठ मंडळींच्या निदर्शनास आलेली आहे. त्यासाठीच त्यांनी अजित पवार हे नवे कार्ड बाहेर काढले आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्या नंतर आगामी मुख्यमंत्री तेच असल्याची कुजबूज भाजपाचे आमदार करत होते. पण अजित पवार यांना सत्तेत घेतल्यावर लगेच मुख्यमंत्री केले असते तर शिंदे यांच्या बरोवर असलेल्या ४० आमदारापैकी निम्मे आमदार शिंदे यांना सोडून गेले असते. ते भाजपला नको होते. त्यातच शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावे असे मोदी, शहा यांना वाटत आहे. यासाठी ते अजित पवार यांच्या माध्यमातून शरद पवार यांची मनधरणी करत आहेत. पण पवार यांनी अद्याप त्यास होकार दिलेला नसल्याने भाजपची  दुहेरी कोंडी झालेली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या निलंबन बाबतचा निर्णय अजून विधानसभा अध्यक्ष यांनी दिला नाही. समजा शिवसेना शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरवले गेल्यास सरकारला तसा फारसा धोका नसेल, पण या निर्णयामुळे भाजपचे हसे होणार आहे.
हे सुद्धा वाचा

विरोधी पक्षनेते असल्यामुळे विजय वडेट्टीवार यांना काहीतरी बोलावं लागतं, म्हणून ते बोलतात. राज्यात दोनशेच्या वर आमदारांचे बहुमत असलेले सरकार आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत. तेच मुख्यमंत्री आहेत आणि तेच मुख्यमंत्रिपदी राहतील, असे आमच्या नेतृत्वाने स्पष्ट केलेले आहे. विरोधकांनी अशीच कितीही स्वप्नं बघितली तरी त्यांची स्वप्नं सत्यात उतरणार नाहीत. असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

विवेक कांबळे

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

4 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

4 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

4 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago