राजकीय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भास्कर जाधवांना फोन; चिपळूण प्रकरणाबाबत म्हणाले…

टीम लय भारी

मुंबई:- चिपळूण येथे रविवारी (ता.25) झालेल्या प्रकरणाबाबत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव म्हणाले, कालच्या आरोपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईला पोहोचेपर्यंत पाच ते सहा फोन आले. बदनामीला घाबरू नकोस, आपल्यामधला शिवसैनिक मरु देऊ नकोस, असे सांगून पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जा, असा सल्ला देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. अशी माहिती स्वतः भास्कर जाधव यांनी दिली आहे (Uddhav Thackeray phone call to Bhaskar Jadhav).

दमदाटी केल्याचा आरोप लागलेले शिवसेना नेते भास्कर जाधव सोमवार (ता.26) वेगळाच ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले. शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांना घेऊन भास्कर जाधव चिपळूण शहरातील साफसफाई करताना पाहायला मिळाले. आपल्यावरील झालेले आरोप फेटाळून लावत भास्कर जाधव यांनी आपण वडिलकीच्या नात्याने तो दिलेला सल्ला होता अशी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत यांची भास्कर जाधवांच्या दमदाटीवर पहिली प्रतिक्रिया

भास्कर जाधवांनी दमदाटी केलेल्या चिपळूणमधील ‘त्या’ महिलेची प्रतिक्रिया

भोजने आणि आमचे घनिष्ठ कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या आरोपांना आम्ही उत्तर देऊ इच्छित नाही. मी सध्या करत असलेले कामच त्यांना उत्तर देईल, कालच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईला पोहोचेपर्यंत पाच ते सहा फोन आले. बदनामीला घाबरू नकोस आपल्यामधला शिवसैनिक मरु देऊ नकोस असे सांगून पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जा असा सल्ला देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती भास्कर जाधव यांनी दिली आहे (This advice was also given by Chief Minister Uddhav Thackeray, said Bhaskar Jadhav).

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांचा चिपळूण दौरा

भास्कर जाधव यांनी प्रांताधिकाऱ्यांना धारेवर धरले

भास्कर जाधव यांनी प्रांताधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. आपण स्वतः रस्त्यावर असताना अधिकारी गेले कुठे? असा सवाल त्यांनी चिपळूणच्या प्रांत अधिकाऱ्यांना केला आहे. नगरपरिषद कर्मचाऱ्यांना पाण्याची एक बाटली पुरवू शकत नाही का? काम करणाऱ्यांना निदान मदत तरी करा, अशा कडक शब्दांत त्यांनी फटकारले आहे.

चिपळूणच्या बाजारपेठेत काल नेमकं काय घडलं

चिपळूणच्या बाजारपेठेत उद्धव ठाकरे एका एका दुकानासमोर जाऊन पीडित दुकानदारांशी संवाद साधत होते. त्याचवेळेस ते एका दुकानासमोर आले. तिथं एक महिला बराच वेळ आक्रोश करत होती. मुख्यमंत्र्यांचं त्या महिलेकडे लक्ष गेलं, त्यावेळेस पीडित महिला म्हणाली, तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या. मुख्यमंत्री त्या महिलेला धीर देण्याचा प्रयत्न करत होते.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी भिलवडी पूरग्रस्तांची विचारपूस करत, केले सांत्वन

CM Uddhav Thackeray’s visit to flood-hit parts in western Maharashtra cancelled due to bad weather

महिला आणि मुख्यमंत्री बोलणं सुरु होतं. पण भास्कर जाधवांनी हस्तक्षेप करत या महिलेला उत्तर दिलं. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला बाकी काय तुझा मुलगा कुठे आहे, अरे आईला समजव, आईला समजव उद्या ये, असे भास्कर जाधव तावातावाने बोलत होते (What exactly happened in the Chiplun market yesterday)

चिपळूणमधील ‘त्या’ महिलेची पहिली प्रतिक्रिया

गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे आणि आमचे घरगुती संबंध आहेत. त्यांनी माझ्या मुलाला वडीलकीच्या नात्याने सांगितलं. मी खूप भावूक झाले होते. आमच्याकडे मोबाईलला रेंज नाही, टीव्ही दिसत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोललं जातं हे अद्याप माहिती नाही. त्यांचा आवाजच तसा आहे. त्यांनी अरेरावी केली नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे ते हातवारे करत बोलत होते. त्यामुळे लोकांना गैरसमज झाला, अशी प्रतिक्रिया चिपळूणमधील त्या महिलेने दिली आहे (People misunderstood, said the woman from Chiplun).

Sagar Gaikwad

Recent Posts

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम,फायबर, मॅग्नेशियम,…

3 mins ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

2 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

3 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

4 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

5 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

19 hours ago