राजकीय

जगामध्ये नंबर एकचे पंतप्रधान असताना इतर पक्ष फोडण्याची गरज का; उद्धव ठाकरे यांचा सनसनीत टोला

अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पायाला भिंगरी लावून 83 व्या वर्षी राज्यभर दौरे काढायला लागले आहेत. शनिवारी त्यांनी येवला येथील सभेत बोलताना छगन भुजबळ आणि अजित पवार यांचे नाव न घेता टीका केली. येत्या काळात पवार राज्यातील सगळे जिल्हे पिंजून काढणार आहेत. असे असताना आता रविवारपासून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. शिवसेना फुटल्यापासून उद्धव ठाकरे सक्रिय झाले असून ते महाराष्ट्रभर दौरे करत आहेत.

दरम्यान, आज त्यांनी अमरावतीत जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारला आणि भाजपाला थेट आव्हान दिले आहेत. पण कामच करायचं नाही. नुसतं हे फोड ते फोड करायचं. मी तर घरी बसलो होतो, तरी सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून माझं नाव येत होतं. तसं संपूर्ण जगामध्ये नंबर एकचे पंतप्रधान आपल्या देशाचे पंतप्रधान असतानाही तुम्हाला अजूनही इतर पक्ष फोडण्याची गरज का वाटते? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी यावेळी विचारला.

आज तुमच्याकडे खोकेच्या खोके पडले आहेत. तुम्ही आमदार विकत घेताय असं मी ऐकतोय. पण त्याच पैशातून माणसं वाचवा ना. माणसं वाचवली तर तुम्हाला कोणाला विकत घेण्याची गरजच लागणार नाही. मतंसुद्धा विकत घ्यावी लागणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी अमरावतीत केली. पण कामच करायचं नाही. नुसतं हे फोड ते फोड करायचं. मी तर घरी बसलो होतो, तरी सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून माझं नाव येत होतं. तसं संपूर्ण जगामध्ये नंबर एकचे पंतप्रधान आपल्या देशाचे पंतप्रधान असतानाही तुम्हाला अजूनही इतर पक्ष फोडण्याची गरज का वाटते? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी यावेळी विचारला.पण कामच करायचं नाही. नुसतं हे फोड ते फोड करायचं. मी तर घरी बसलो होतो, तरी सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून माझं नाव येत होतं. तसं संपूर्ण जगामध्ये नंबर एकचे पंतप्रधान आपल्या देशाचे पंतप्रधान असतानाही तुम्हाला अजूनही इतर पक्ष फोडण्याची गरज का वाटते?” असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी यावेळी विचारला.

शिवसेना पक्ष चोरला, आज राष्ट्रवादी चोरली. उद्या आणखी काही चोरतील. जे काही देशाचं आहे ते विकून टाकायचं. जे राहिलं ते विकून टाकायचं आणि इतर ठिकाणी काही ठेवायचं नाही. दुसऱ्यांचं आहे ते चोरायचं. दोन शब्द यांच्यासाठी आहेत एक आहे तो मस्ती आणि दुसरा आहे आत्मविश्वास. भाजपाला सत्तेची मस्ती आली आहे. पण त्यांच्या ताकदीचा आत्मविश्वास त्यांच्याकडे नाही. आपण एवढे मोठे झालो, सत्ताधीश झालो, तरीही त्यांना धाकधूक वाटते की आपण निवडून येऊच शकत नाही. सत्तेची मस्ती हीच ती. मग ईडी लाव, सीबीआय लाव, पोलीस लाव असं करायचं. विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर केला जातो आहे. पोलिसांतर्फे नोटीसा दिल्या जात आहेत. जर तुम्ही मर्दांची अवलाद असाल तर या सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा आणि मैदानात या, असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं.

हे सुद्धा वाचा

पाऊस आला आणि पवारांना विरोध करणारा संपून गेला…

एका नावात घोळ झाला, माझा अंदाज चुकला; शरद पवारांनी येवलेकरांची मागितली माफी

‘एक सही संतापाची’; मनसेच्या आंदोलनाला मुंबईत उदंड प्रतिसाद  

माझ्यावर टीका केली जाते की मी इतके दिवस घरी बसून होतो. होय मी घरी बसून होतो पण मी कुणाची घरं फोडली नाहीत. घरफोडे तुम्ही (भाजपा) आहात. मला कितीही काहीही म्हणा की मी घरी बसून काम केलं. मी घरी बसून जे काम केलं ते तुम्हाला घरं फोडूनही करता येत नाही. त्यामुळेच तुम्हाला दारोदारी जातं आहे कारण कुणी दारातच उभं करत नाही. कुठे पोलिसांना बसवलं जातं आहे, कुठे शिक्षकांना कामं सोडून बसवलं जातं आहे. असं म्हणत शासन तुमच्या दारी या मोहिमेवरही उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.

विवेक कांबळे

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

11 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

12 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

15 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

15 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

15 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

16 hours ago