VIDEO : उद्धव ठाकरेंचे विधान : शरद पवार, राहूल तुला लाज वाटते का ?

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने शिवसेना सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. परंतु याच काँग्रेस व राष्ट्रवादीवर उद्धव ठाकरे यांनी चोर व दरोडेखोर म्हणून घणाघाती आरोप केले होते. एवढेच नव्हे तर, शरद पवार, राहूल तुला लाज वाटते का ? अशा एकेरी शब्दांत ठाकरे यांनी तोफ डागली होती. उद्धव ठाकरे यांचा हा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल झाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरे यांनी हे भाषण केले होते. परभणी येथील सभेत हे भाषण त्यांनी केले होते. या भाषणात उद्धव म्हणतात की, शरद पवारांना सांगा, शेण खाणारी राष्ट्रवादीची अवलाद आमच्याकडे नाही. आम्ही खड्ड्यातून बाहेर पडलो. कारण आम्ही सगळे मिळून तुमच्यासारख्या कर्मदरिद्री विरोधी पक्षाला खड्ड्यात घालण्यासाठी एकवटलेलो आहोत. कोणावरती तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहात ? तुमच्या भ्रष्टाचाराचे मी एक पुस्तक तयार केले आहे. यांना असे वाटते की, गेल्या पाच वर्षांत सगळे विसरून गेले असतील. काँगेस आणि राष्ट्रवादीवाले कोण होते. चोर, दरोडेखोर होते. तुमच्या घोटाळ्यांचे पुस्तक मी पाच वर्षांपूर्वी काढले होते. ते माझ्या हातात आहे. पवार साहेब, राहूल तुला लाज वाटते का ? चोर म्हणून तुम्ही युतीवरती आरोप करता ? चोर, दरोडेखोर स्वतःच आहात.

‘लय भारी’ बातम्या वॉट्स अपवर मिळविण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

VIDEO : शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी भाजपकडून बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राहूल गांधी व शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन ठाकरे यांनी घणाघात केला आहे. या भाषणातील भाषा आता काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना तरी सहन होईल का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

तुषार खरात

Recent Posts

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

9 mins ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

3 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

3 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

3 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

4 hours ago

पावसाळ्यात या 5 प्रकारच्या तेलांनी करा केसांना मसाज, केसगळतीपासून मिळेल आराम

पावसाळ्यात केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या वाढते. वास्तविक या काळात पावसात भिजल्यामुळे केसांची मुळे कमकुवत…

7 hours ago