देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीत, ना…बँड..ना बाजा.. ना..बाराती : अहेमद पटेल

लय भारी न्यूज नेटवर्क 

मुंबई : भाजपने देवेंद्र फडणवीसांचा पहाटे गुपचूप मुख्यमंत्रीपदाचा सोहळा उरकला. त्याचा काँग्रेसनेते अहमद पटेल यांनी जोरदार समाचार घेतला. ना बँड.. ना बाजा.. ना.. बाराती, नसतांनाही शपथविधी सोहळा उरकला आणि बिदाई केली. असा टोला शनिवारी अहेमद पटेल यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
अहमद पटेल म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासातला आजचा काळा दिवस आहे. कुठेतरी काहीतरी चुकीचं घडलयं. यापेक्षा जास्त लज्जास्पद काही असू शकत नाही अशा शब्दात काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी भाजपाच्या सरकार स्थापन करण्याच्या निर्णयावर टीका केली.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आम्ही तिघे एकत्र आहोत. विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी आम्ही भाजपाला पराभूत करु हा मला विश्वास आहे. दोन काँग्रेस आमदार वगळता सर्व आमदार इथे उपस्थित आहेत. ते दोन आमदार त्यांच्या गावी असून ते सुद्धा आमच्यासोबतच आहेत असे अहमद पटेल म्हणाले. राजकीय आणि कायदेशीर अशा दोन्ही घाडयांवरलढाई लढणार असल्याचे अहमद पटेल यांनी सांगितले.
राजीक खान

View Comments

  • एखाद्या घडामोडींचे विविधांगी लेखन खरोखरच उल्लेखनीय आहे.
    U R just great.
    सुधीर जाधव.

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago