राजकीय

‘आदित्य ठाकरेंना खून करावासा वाटला तर, पहिल्यांदा नारायण राणेंचा करतील’

टीम लय भारी

मुंबई : सुशांत सिंग राजपूत व त्याची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणी नारायण राणेंनी ठाकरे कुटुंबियांकडे बोट दाखविले आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांनी राणे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे ( Uttam Jankar scathing to Narayan Rane ).

राणेंची अवस्था ‘काय होतास तू, अन् काय झालास तू’ अशी झाली आहे. त्यांना ठाकरे द्वेषाने पछाडले आहे. ते ऊठसूठ ठाकरे कुटुंबाच्या विरोधात सतत वाट्टेल ते बरळत असतात. त्यांची मानसिकता विकृत झाली आहे. भंपक मनुष्य म्हणून नारायण राणेंना आता राजकारणात ओळखले जाते. त्यांना कुणीही जमेस धरत नाही, असा आरोप जानकर यांनी केला आहे ( Uttam Jankar says, Narayan Rane hasn’t credibility ).

नारायण राणेंसारख्या आक्रस्ताळ्या नेत्याविषयी सुद्धा आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे कमालीचे संयम बाळगून असतात. असे असताना ते दिशा सालियन किंवा सुशांत सिंह राजपूत यांचा खून करण्याच्या भानगडीत कशाला पडतील. त्यांना खून करायचाच असेल तर पहिल्यांदा नारायण राणे यांचाच करतील, असे वक्तव्य जानकर यांनी केले.

हे सुद्धा वाचा

अमृता फडणवीसांना रेणुका शहाणेंनी सुनावले

सुशांत सिंग राजपूतच्या मॅनेजरवर बलात्कार, सुशांतची हत्या : नारायण राणे

आदित्य ठाकरे म्हणाले, मी बाळासाहेब ठाकरेंचा नातू; माझ्याकडून दुष्कृत्य होणार नाही

भाजपने शरद पवारांवरही ईडीची कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा उलटा परिणाम झाला. महाराष्ट्रातील जनता खवळली. राष्ट्रवादी व काँग्रेस या दोन्ही पक्षांना विधानसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा चांगले यश आले. भाजपने ब्लॅकमेलिंग करून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला तर पुढील 25 वर्षे सत्ता मिळणार नाही, असाही टोला जानकर यांनी लगावला.

भाजपने कर्नाटक व मध्य प्रदेशमधील प्रयोग महाराष्ट्रात करू नयेत. महाराष्ट्रातील जनतेला असे प्रकार मानवत नाहीत. अशी राजकीय षडयंत्रे जनता हाणून पाडते याचाही विचार भाजप नेत्यांनी करावा, असा सल्ला जानकर यांनी दिला ( Uttam Jankar attacks on BJP leaders ).

कोण आहेत जानकर ?

जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरसमधील नेते आहेत. भाजप उमेदवाराच्या विरोधात त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती. पण अवघ्या 1200 मतांनी जानकर यांचा निसटता पराभव झाला होता ( Uttam Jankar had lost assembly election in Malshiras ).

 

जानकर हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक

जानकर हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक आहेत. मोहिते पाटील यांच्या साम्राज्याला ते सतत दोन हात करीत असतात. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधातही उत्तम जानकर यांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळीही त्यांचा निसटता पराभव झाला होता ( Uttam Jankar is a strong opponent of Vijaysinh Mohite Patil ).

वर्षभरापूर्वी मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देवून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी जानकर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. 1 लाखापेक्षा जास्त मते घेऊन जानकर यांनी भाजप उमेदवाराला घाम फोडला होता.

तुषार खरात

Recent Posts

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

43 mins ago

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

1 hour ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

2 hours ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

2 hours ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

2 hours ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

18 hours ago