राजकीय

विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज

उध्दव सेनेने उमेदवारी देण्याचा वर्षभरापूर्वीच शब्द दिला आणि ऐनवेळा शब्द फिरवला असा आराेप करीत अखेरीस या पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी अपक्ष (independent) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येत्या दोन दिवसात यासंदर्भात समर्थकांचा मेळावा घेऊन मगच उमेदवारीबाबत घेऊ असे त्यांनी सांगितले. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात उमेदवारी दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज नेणाऱ्या करंजकर (Vijay Karanjkar) यांनी अर्ज दाखल केला आहे.(Vijay Karanjkar files nomination as independent )

आपल्याला वर्षभरापूर्वी उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आपण मतदार संघात चार फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. आणि ऐनवेळी उमेदवारी कापली. त्यामुळे अखेरीस आपण उमेदवारीचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. आपल्याबरोबर शिवसेनेचे ३५ माजी नगरसेवक आणि चार जिल्हा परीषद सदस्य तसेच काही पदाधिकारी असल्याचेही ते म्हणाले तसेच शिवसेना प्रमुखांनी आपल्याला तीन वेळा मातोश्रीवर बोलवले. मात्र, मी खूप मोठा मोर्चा घेऊन मातोश्रीवर जाणार असल्याची चूकीची माहिती मातोश्रीला दिली गेली आणि त्यामुळे ऐनवेळी त्यांनी तीन्ही वेळेस भेट टाळली असेही करंजकर म्हणाले.

टीम लय भारी

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

3 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

4 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

7 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

8 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

9 hours ago