राजकीय

नया नया पंछी है, वडेट्टीवारांचा पडळकरांवर हल्लाबोल

टीम लय भारी

गोंदिया : राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नया पंछी ज्यादा फडफड करता है अशा खोचक शब्दात वडेट्टीवारांनी टोला लगावला आहे(Vijay vadettiwar slammed padalkar calling new bird).

विजय वडेट्टीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ वाहवा मिळवण्यासाठी मागासवर्ग आयोगासाठी ४५० कोटींची घोषणा केली, दिलेत फक्त साडेचार कोटी; पण ते खर्च करण्याचे आदेशच आयोगाला मिळाले नाहीत. ना ऑफिस ना पुर्णवेळ सचिव, आयोगाचे संशोधक सोलापुरात तर आयोग पुण्यात! वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी ‘फुकटचे घावले आणि गाव सारे धावले, अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली, असा टोला भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला होता. त्याला आता वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले.

माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार म्हणाले की, ते नवीन आहेत. नया नया पंछी है, थोडा ज्यादा फडफड करत है असा खोचक निशाणा वडेट्टीवारांनी साधला आहे.गोपीचंद पडळकर यांना ज्ञान नसल्याचे वड्डेट्टीवार बोलले आहेत. गोपीचंद पडळकर यांना ज्ञान नसल्याची टीकाही त्यांनी केली. ज्या माणसावर लूटमारी, फसवणूक, शेती हडप करणे, ॲट्रोसिटी सारखे गुन्हे लागले आहेत त्या व्यक्तिच्या विधानावर बोलणे चुकीचे ठरेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसचा विचार हा देशाच्या प्रगतीचा आणि माणसाच्या उन्नतीचा आहे : बाळासाहेब थोरात

महाराष्ट्रातून सर्वात जास्त डिजीटल सदस्य नोंदणी करणार : नाना पटोले

Maharashtra winter session: 1078 farmer suicides reported in state during June-October 2021, says Vijay Wadettiwar

राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाच्या खात्यात 5 कोटी रुपये दिले आहेत. तो निधी आयोगाने कसा खर्च कारायचा हे सर्वस्वी त्यांच्यावर आहे. त्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यात आले आहेत. पैसे खर्च करण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही. पडळकरांना अर्धवट माहिती देण्यात आली आहे. चुकीच्या माहितीवरुन ते आरोप करत आहेत. कोणाच्या प्रश्नावर उत्तर द्यायचे ज्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे आहेत त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी पडळकरांचा समाचार घेतला आहे.

Team Lay Bhari

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

15 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

16 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

17 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

18 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

18 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

18 hours ago