राजकीय

विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर झालेल्या सुनावणीनंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने अजमल कसाबचे फाशीच्या शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळताना कसाब ने आपणच हेमंत करकरे यांच्यासह तीन पोलीस अधिकाऱ्यांना ठार केल्याच्या कबुलीजबाबाचा विशेष उल्लेखही केला होता. असे असतानाही ” हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाब ची नव्हती, ही गोष्ट दडपणारे उज्जवल निकम हे देशद्रोही आहेत, ”असे विधान केल्याबद्दल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कायदा विभागाचे सहसंयोजक ॲड. शहाजी शिंदे यांनी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल नोटीस (contempt notice) पाठवली आहे.(Vijay Wadettiwar gets contempt notice)

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार अर्जुन गुप्ता यांच्या वतीने ॲड. शिंदे यांनी वडेट्टीवार यांना ही नोटीस बजावली आहे.या नोटिशीत ॲड. शहाजी शिंदे यांनी म्हटले आहे की, मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात 11 दहशतवाद्यांचा सहभाग होता. त्यापैकी एकाला म्हणजे अजमल कसाब ला जिवंत पकडण्यात यश मिळाले. कसाब याच्यावर सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून न्यायालयात खटला दाखल केला गेला. सत्र न्यायालयात न्या. तहलियानी यांनी उपलब्ध पुराव्यांचा विचार करून कसाब ला फाशीची शिक्षा सुनावली. याविरुद्ध कसाबने उच्च न्यायालयात अपील केले होते. ते अपील फेटाळून उच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. कसाबतर्फे सर्वोच्च न्यायालयात या शिक्षेला आव्हान दिले गेले.

सर्वोच्च न्यायालयाने कसाबचे अपील फेटाळून त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली. सर्वोच्च न्यायालयाने कसाबचे अपील फेटाळताना कसाबने आपण हेमंत करकरे यांच्यासह तीन पोलीस अधिकाऱ्यांना गोळ्या घालून ठार केल्याबाबत दिलेल्या कबुलीजबाबाचा निकालपत्रात विशेष उल्लेख केला आहे. असे असतानाही वडेट्टीवार यांनी करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीमुळे झाला नाही असे विधान जाहीररीत्या करून न्यायालयाचा अवमान केला आहे. आपल्या विधानांमुळे न्यायालयाचा अवमान कायदा 1971 नुसार आपल्यावर फौजदारी कारवाई करण्यास आपण पात्र ठरला आहात. या नोटिशीला 15 दिवसांत उत्तर न दिल्यास आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरु करण्यात येईल, असेही ॲड. शहाजी शिंदे यांनी नोटिशीमध्ये नमूद केले आहे. वडेट्टीवार यांच्या कार्यालयात ही नोटीस पाठविण्यात आली असून ई मेल द्वारेही नोटीस पाठविली गेल्याचे ॲड. शिंदे यांनी सांगितले.वडेट्टीवार यांच्या कार्यालयात ही नोटीस पाठविण्यात आली असून ई मेल द्वारेही नोटीस पाठविली गेल्याचे ॲड. शिंदे यांनी सांगितले.

टीम लय भारी

Recent Posts

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

9 mins ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम,फायबर, मॅग्नेशियम,…

42 mins ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

3 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

3 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

5 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

5 hours ago