राजकीय

Wadhawan : शरद पवार, अनिल देशमुखांवर भाजपचा निशाणा

टीम लय भारी

मुंबई : वाधवा ( Wadhawan ) कुटुंबियांना महाबळेश्वरला जाण्यासाठी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी लेखी परवानगी दिली. परंतु हे पत्र शरद पवार व अनिल देशमुख यांच्या मान्यतेशिवाय दिलेच जाऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व किरिट सोमय्या यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

‘गंभीर परिणामांची जाणीव असूनही एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी अधिकारी असे पत्र देऊ शकत नाही. त्यामुळे कुणाच्या सुचनेने किंवा आशिवार्दाने हे पत्र दिले गेले, याचे स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री व गृहमंत्री तुमच्यावर आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. धनदांडग्यांना ( Wadhawan ) महाराष्ट्रात लॉकडाऊन नाही का ? असाही सवाल फडणवीस यांनी केला आहे.

‘गृहमंत्र्यांना अंधारात ठेवून असे पत्र देणे अशक्य आहे. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांची सखोल चौकशी करून त्यांचा त्वरीत राजीनामा घ्यावा’, अशी मागणी चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. डीएचएफएल समुहाचे वाधवा ( Wadhawan ) कुटुंबिय पॅरोलवर बाहेर आहेत. त्यांना सीबीआयच्या ताब्यात देण्याऐवजी राष्ट्रवादीकडे असलेल्या गृह खात्याने त्यांना विशेष सवलत दिल्याचा संतापही पाटील यांनी व्यक्त केला आहे.

किरीट सोमय्या यांनी तर गृह सचिव अमिताभ गुप्ता व वाधवा ( Wadhawan ) कुटुंबातील २३ जणांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. गुप्ता व वाधवा ( Wadhawan ) कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. पवार कुटुंबियांमुळेच वाधवा यांना या पत्र मिळाले असेल असाही सोमय्या यांनी आरोप केला आहे.

किरीट सोमय्या बेजाबदादर विधाने करतात. म्हणून तर त्यांना भाजपने लोकसभेचे तिकिट दिले नव्हते. आयएएस व आयपीएस अधिकारी हे केंद्र सरकारच्या अधिकारात असतात. केंद्राने हवी तर गुप्ता यांच्यावर कारवाई करावी अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्याकडेही लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली आहे.

हे सुद्धा वाचा

Wadhawan : गृह सचिव अमिताभ गुप्तांचा बेफिकीरपणा, बिल्डरला 23 जणांसह महाबळेश्वरला जाण्यासाठी दिली परवानगी

Lockdown21 : उद्धव ठाकरे – अनिल देशमुखांची धडक कारवाई, बेजबाबदार IPS गुप्तांना पाठविले सक्तीच्या रजेवर

फळांना चाटणाऱ्या व्हिडीओची सत्यता

तुषार खरात

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

15 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

16 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

17 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

17 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

18 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

18 hours ago