‘फडणवीसांच्या नशिबात काय लिहिलंय, हे सटवीलाच माहित’

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : पाच वर्षे पूर्ण काळ मुख्यमंत्री. त्यानंतर सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्री. मुख्यमंत्री झाल्यानंतर आता विरोधी पक्षनेते… देवेंद्र फडणवीस यांच्या नशिबात काय लिहून ठेवलंय हे सटवीलाच माहित अशा भावना भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज विधानसभेत व्यक्त केल्या.

देवेंद्र फडणवीस यांची आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. त्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदनाच्या ठरावावर शेलार बोलत होते.

शेलार पुढे म्हणाले की, शनिवारी हंगामी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी टाकलेला सवाल सहज टोलावण्यासारखा नव्हता. पण त्यावर धाडसाने व तत्पर उत्तर देणारे फडणवीस आज विरोधी पक्षनेतेपदी आलेले आहेत. या सदनात कायद्याचा सिद्धांत मांडणारा सभासद म्हणून फडणवीस यांची ओळख आहे. संघ स्वयंसेवक म्हणून मिळेल ते काम करण्याची त्यांची भावना आहे. मनात दुःख नाही. क्लेष नाही. वेदना नाही. एक स्वयंसेवक पुन्हा विरोधी पक्षनेता होतोय, त्याचा आम्हाला आनंद आहे. फडणवीस हे रात्रीलाही पहारा देणारे नेते आहेत. चुकीचे घडले तर तिथे जागता पहारा ठेवणारा हा नेता आहे. त्यांच्यावर काहींनी जातींचे वार केले. घेतलेल्या निर्णयांचे वार केले. दुसऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांचे वार केले. पण ते डगमगले नाहीत. आता फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत. सरकारला एकही निर्णय चुकीचा घेऊ देणार नाहीत, असाही विश्वास शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.

विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती

विधानसभेच्या अध्यक्षपदी आज नाना पटोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपचे उमेदवार किसन कथोरे यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे पटोले यांची बिनविरोध निवड होऊ शकली.

तुषार खरात

Recent Posts

कानपूरमध्ये इतिहास रचणार विराट कोहली! सचिन तेंडुलकरच्या क्लबमध्ये होणार सामील

भारत आणि बांगलादेशमध्ये दुसरा कसोटी सामना 27 सेप्टेंबरला खेळला जाणार आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन…

3 mins ago

‘पुष्पा 2’ ची नवीन रिलीज डेट जाहीर, या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आपल्या धमाकेदार चित्रपटासाठी ओळखला जातो. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर…

48 mins ago

‘खतरों के खिलाडी 14’ ग्रँड फिनालेमध्ये होणार आलिया भट्टची एंट्री

कलर्स टीव्हीचा प्रसिद्ध शो 'खतरों के खिलाडी 14' त्याच्या फिनाले जवळ आला आहे. या शोचे होस्ट…

1 hour ago

मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी दररोज करा ‘हे’ सोपे व्यायाम

आजकल सर्वनाचा सुंदर आणि फिट दिसायला आवडते. त्यासाठी लॉग योग, व्यायाम आणि जिम सुद्धा लावतात.…

2 hours ago

संध्याकाळी व्यायाम करणे योग्य की नाही? जाणून घ्या

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आपल्या शरीराकडे लक्ष्य द्याचा वेळ सुद्धा…

3 hours ago

Sharad Pawar | Jaykumar Gore यांचा शेजारी म्हणतो, शेतकऱ्यांसाठी शरद पवार किंग, जयकुमार गोरे पडणार

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jaykumar Gore's neighbor…

3 hours ago