Categories: राजकीय

शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत आमची कोणतीही स्ट्रॅटेजी नाही, राज्यपालांच्या भूमिकेकडे आमचे लक्ष : बाळासाहेब थोरात

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत काँग्रेसची कोणतीही स्ट्रॅटेजी नाही. मात्र राज्यपाल काय भूमिका घेणार याकडे आमचे लक्ष आहे. राज्यपालांनी आता हालचाली करणे गरजेचे आहे. शरद पवार यांच्यासोबतही आमची हीच चर्चा झाल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना सांगितले. पवार यांच्यासोबत आज काँग्रेसचे प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर थोरात यांनी ही माहिती दिली. यावेळी (तिन्ही) माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात अभूतपुर्व अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुख्यमंत्री आज राज्यपालांना जाऊन भेटले. मंत्रीमंडळाच्या शपथविधीचे निमंत्रणासाठी घेण्यासाठी ते राज्यपालांकडे गेले असतील असे वाटले होते. पण त्यांनी तर राजीनामा दिला. आम्ही मावळत्या मुख्यमंत्र्यांचे व उद्धवजी ठाकरे यांची निवेदने ऐकली. राज्यातील राजकीय परिस्थिती गडद झाली आहे. याची चर्चा आम्हाला शरद पवार यांच्याशी करायची होती. ते ज्येष्ठ आहेत. त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. शरद पवार हे आघाडीचे नेते आहेत. आम्ही त्यांचे सतत मार्गदर्शन घेत असतो. चिघळलेल्या राजकीय स्थितीत राज्यपाल कोणते पाऊल उचलतात ही बाब महत्वाची आहे. सरकार स्थापनेसाठी सर्वात मोठ्या पक्षाला निमंत्रण देण्याची जबादारी राज्यपालांची असते.

भाजपने जनतेचा कौल मान्य करून सत्ता स्थापन करायला हवी होती. आमच्याकडे तो आकडा नाही. शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही. आम्ही राज्यपालांच्या निर्णयाकडे पाहात आहोत. सरकार स्थापनेची प्रक्रिया राज्यपालांनी पूर्ण करायला पाहीजे. आम्ही कोणतेही डावपेच तयार केलेले नाहीत. बिगरभाजप सरकार सत्तेवर यावे अशी कल्पना करणे योग्य आहे. पण ते कसे करणार. आमच्याकडे नंबर नाहीत. ही जबाबदारी भाजपची होती. त्यांनी ती पूर्ण केली नाही. या सगळ्या परिस्थितीला भाजप जबाबदार आहे. पवार यांच्यासोबत विविधांगी चर्चा झाली. पूर्वीच्या घटनांचीही चर्चा झाली.

आमची धर्मनिरपेक्ष विचारधारा आहे. परंतु भाजपलाही अलग ठेवायचे आहे. त्या अनुषंगाने पवार यांच्यासोबत जनरल चर्चा झाली आहे. पण ठोस चर्चा काहीही झालेली नाही.

  • सुशीलकुमार शिंदे

पृथ्वीराज चव्हाण : महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर 15 दिवस अस्थिर परिस्थिती होती. ती आज संपुष्टात आली आहे. भाजप सरकार बनवू शकणार नाही, याची त्यांनी कबुली दिली आहे. भाजपच्या पाच वर्षाच्या नाकर्तेपणामुळे ही परिस्थिती आलीय. जनतेने त्यांना नाकारलं आहे. महाराष्ट्रात चार वर्षे दुष्काळ पडला होता असे फडणवीस म्हणतात. मग बुलेट ट्रेन आणि हायपर लूप ट्रेन देवून लाखो कोटींचे कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर का ठेवलं आहे. भाजपला शेतकरी, जनतेची काळजी नाही. अतिवृष्टीमुळे शेतकरी कोलमडला आहे. गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने एकही मोठे काम केलेले नाही. म्हणून सरकारला जनतेने नाकारले आहे. कितीही तोडाफोडीचा प्रयत्न केला तरी भाजपचे सरकार येणार नाही. हे त्यांना कळले आहे. त्यामुळे आता राज्यपाल हातात कारभार घेणार का ? घटनात्मक पेच निर्माण झाले आहेत. राज्यपालांनी सर्व सूत्रे हाती घेतली तर शेतकऱ्यांसाठी मदत कार्य हाती घ्यायला हवे. अतिवृष्टीमुळे पिडीत झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत या काळजीवाहू सरकारने जरी काही निर्णय घेतले तरी आम्ही विरोध करणार नाही. पण लवकरात लवकर घटनात्मक सरकार यायला हवे

तुषार खरात

Recent Posts

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

1 hour ago

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

19 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

20 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

21 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

21 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

22 hours ago