आपण ओबीसींसाठी शेवटपर्यंत लढणार : मंत्री छगन भुजबळ

आपल्याला आमदारकी, मंत्री पदाची कुठलीही फिकीर नसून ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण शेवटपर्यंत लढणार आहोत. त्यामुळे कुठल्याही दबावाला बळी न पडता संपूर्ण ओबीसी समाजाने एकत्र येऊन लढलं पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार मेळावा आज अहमदनगर येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आ.महादेव जानकर,आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, मुस्लिम ओबीसी संघटनेचे शब्बीर अन्सारी,प्रा.लक्ष्मण हाके, सत्संग मुंडे, प्रा.पी टी चव्हाण,पांडुरंग अभंग, कल्याण दळे,शंकरराव लिंगे,दौलतराव शितोळे, डॉ.सुदर्शन घेरडे , नागेश गवळी, विशाल वालकर, भगवान फुलसुंदर,अंबादास गारुडकर यांच्यासह ओबीसी भटके विमुक्त समाजातील बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

भाषणाच्या प्रारंभी ते म्हणाले की, गोरगरिबांना न्याय देणारे बिहारचे माजी मुख्यमंत्री, आपल्या नाभिक समाजाचे स्व. कर्पूरीजी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याबद्दल भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे मी मनापासून आभार मानतो. हा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना जाहीर करून देशासाठी, समाजासाठी काम करणाऱ्या ओबीसी समाजाचं ऋण त्यांनी मान्य केलं असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, इंग्रजांना सलग १४ वर्षे सळो की पळो करून सोडणारे आणि सर्वप्रथम क्रांतीचे स्वप्न देशाला दाखवणारे आमचा आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी देशासाठी फासावर गेले. फक्त रामोशी समाजाचेच नाही, तर ते देशाचे नाईक झाले. अशी अनेक नररत्न या समाजाने देशासाठी दिलेली आहेत. ही आमची लायकी असल्याचे सांगत लायकी काढणाऱ्यांचा समाचार घेतला. तसेच नगरला आल्यावर माझे जुने सहकारी, माजी मंत्री स्व. अनिलभैय्या राठोड यांची आठवण आल्याशिवाय रहात नाही. त्यांच्या समाजाची नगर शहरात अवघी ४०-५० घरं असतील. पण २५ ते वर्षे आमदार होते. लढायला लागतं, रडून काही होत नाही असे त्यांनी आवर्जून सांगितले.

ते म्हणाले की, खोटे पुरावे सादर करून कुणबी प्रमाण पत्र मिळवले जात आहे. असे खोटे प्रमाणपत्र जर दिले गेले तर आरक्षण ओबीसींचे सर्व आरक्षण संपुष्टात येईल हे सर्वांच्या लक्षात येत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इंदिरा सहानी केसचा दाखला देत मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आजवर सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल आहेत ते मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत. झुंडशाहीने कोणी आरक्षण घेतले तर त्याला बाहेर काढले जाईल असे निवाडे असल्याचे अनेक दाखले त्यांनी दिले.

ते म्हणाले की, मराठा समाजाबाबत मसुदा निघाल्यापासून महाराष्ट्रामध्ये उन्माद केला जातोय ओबीसी लोकांना त्रास दिला जातोय. त्यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली जातेय. ओबीसी मोर्चात सामील होतात म्हणून मारहाण केली जात आहे त्रास दिला जात आहे. हे नेमक कशासाठी केल जातंय असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला. तसेच ते म्हणता आहे की आम्हाला आरक्षण मिळालं म्हणून गुलाल उधळत आहोत. जर तुम्हाला आरक्षण मिळालं गुलाल उधळला मग आता पुन्हा उपोषण का करताय असा टोला त्यांनी मनोज जरांगे यांना नाव न घेतला लगावला. तसेच ते तर आता अर्थसंकल्पातून आरक्षण मागत असल्याचा चिमटा देखील त्यांनी काढला.

ते म्हणाले की, आज आपले प्रश्न सोडविण्यासाठी ओबीसी समाजाने कुठल्याही दबावाला बळी न राहता एकत्र येऊन लढलं पाहिजे. आज ही वेळ ओबीसींवर आली आहे. उद्या ती दलित, आदिवासीवर देखील येईल त्यामुळे या लढ्यात ओबीसी बांधवांसोबत दलित आदिवासी बांधवानी देखील साथ महत्वाची असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच बिहार आणि आंध्र प्रदेश प्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी त्यांनी केली.

टीम लय भारी

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

18 hours ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

19 hours ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

19 hours ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

7 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago