राजकीय

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच मुख्यमंत्री पदासाठी आदल्या दिवसापर्यंत माझही नाव रेसमध्ये होतं. मला मुख्यमंत्री पद नको होतं. परंतू सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्र्याच्या पालखीत बसवायचे सांगत स्वत:च या पदावर टुमकन उडी मारुन बसले. तुम्हाला महागद्दार म्हणायचे का, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता केला.शिवसेना शिंदे गटाचा मेळावा व पक्षप्रवेश सोहळा बुधवारी (दि.८) पार पडला. त्यावेळी त्यांनी ठाकरेंवर चौहुबाजुने टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, महाविकास आघाडीचा केलेला अनैसर्गिक युतीचा प्रयोग जनतेला आवडला नसून आपण लोकांना काय तोंड दाखवायचे असे मी सांगितले होते.(You turned out to be expensive
Chief Minister Eknath Shinde; Attack on Thackeray)

लग्न एकासोबत तर संसार दुसर्‍यासोबत असा हा प्रकार होता. याबाबत राज ठाकरेंनीही मला फोन करुन विचारणा केली होती.पण उध्दव ठाकरे यांना सत्तेचा मोह होता. मुख्यमंत्री पदाची त्यांची सुप्त इच्छा अगोदरपासून होती. पण बाळासाहेबांना त्यांची कुवत माहित असल्याने त्यांनी ती पूर्ण होऊ दिली नाही. मुख्यमंत्री पद म्हणजे एरियल फोटोग्राफी नव्हे असा टोला शिंदे यांनी लगावला. सत्तेत असूनही शिवसैनिकांचे खच्चीकरण सुरु होते.धनुष्यबाण काॅग्रेसच्या दावणीला बांधले गेल्याने आम्ही शिवसेनेचे धनुष्यबाण वाचवले, असे त्यांनी सांगितले.कार्यकर्ते आमदार माझ्यासोबत असून पन्नास लोक निर्णय घेतात त्यास कारणही. तेवढं मोठं असतं.पंचवीस राज्यातले लोक माझ्यासोबत असून राजस्थानातील चार अपक्ष आमदारही माझ्या सोबत आहे.नुसतं गद्दार व खोके म्हणून चालत नाही. उद्या तुम्ही कोर्टाला व मतदारांना गद्दार म्हणायला कमी करणार नाही,असा प्रहार त्यांनी ठाकरेंवर केला. यावेळी करंजकर समर्थकांनी शिंदे गटात प्रवेश केला. याप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे, खा.हेमंत गोडसे, माजी मंत्री बबन घोलप, आ.सुहास कांदे,उपनेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आदी उपस्थित होते.

घर बसणार्‍यांना सहानभुती नाही
मागील दोन वर्षापासून आम्ही काम करत आहोत.लोकांना मदत करत आहोत. फेसबुक लाईव्ह काम होत नाही. घरी बसणार्‍या जनतेची सहानभुती मिळणार नाही, असा टोला त्यांनी ठाकरे यांना लगावला.

राऊतांना राज्यसभेवर पाठवल्याचा पश्चताप
राज्यसभेच्या निवडणुकीत माझा अपमान केला. त्याचवेळी इतर सहकारी संजय राऊत यांच्या विरोधात होते. मात्र आम्ही त्यांना मत देऊन राज्यसभेवर पाठवले. त्याचा पश्चताप आता होत असून पुन्हा संधी मिळेलच असा इशारा देत राउर सरपंचही निवडूण येऊ शकत नाही अशी जोरदार टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

वाघाची झेप दाखवून देईल : करंजकर
पक्षप्रमुख ठाकरेंनी उमेदवारीचा शब्द दिल्याने वर्षभरापासून कामाला लागलो होतो. आदल्या दिवसापर्यंत माझे नाव होते. परंतू इथल्या काही गद्दारांच्या गटाने घात केला. या अगोदर शिंदे गटात गेलेल्यांना गद्दार गद्दार म्हणायचे.पण मेल्यानंतर स्वर्ग दिसत असं म्हणतात. त्याची प्रचिती आता आली असे सांगत वाघाची झेप काय असते हे दाखवुन देईल असा इशारा त्यांनी ठाकरे गटाला दिला.

टीम लय भारी

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

6 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

6 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

6 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

7 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

9 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

9 hours ago