महाविकास आघाडीकडे १६२ आमदार, फडणवीस – पवारांकडे उरले अवघे १२६ जण

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : महाविकास आघाडीच्या वतीने सहा पक्षांमार्फत आज राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणारे पत्र देण्यात आले आहे. या पत्रावर तब्बल १६२ आमदारांच्या स्वाक्षरी आहेत. महाविकासआघाडीने राज्यपालांकडे १६२ आमदारांचे संख्याबळ सादर केले आहे, त्यामुळे भाजपकडे केवळ १२६ आमदार उरले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे घाईगर्दीत बनविण्यात आलेले देवेंद्र फडणवीस – अजित पवार सरकार अल्पमतात असल्याचे दिसत आहे.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिन्ही नेत्यांनी आज राजभवनात जाऊन हे महत्वाचे पत्र सादर केले आहे. हे पत्र सादर केल्यानंतर जयंत पाटील म्हणाले की, आम्ही १६२ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र राज्यपालांना दिलेले आहे. भाजपने त्यांच्याकडे बहुमत नाही असे पूर्वी सांगितले होते. आजही त्यांच्याकडे बहुमत नाही. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष, सीपीएम, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा सहा पक्षांतील १६२ आमदारांचे आमच्याकडे बहुमत आहे. फडणवीस यांच्याकडे ते बहुमत नाही. त्यांनी चुकीची कागदपत्रे राज्यपालांकडे दिली होती. त्या आधारे राज्यपालांनी फडणवीस व अजित पवार यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केले होते. पण बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे राज्यपाल लोकशाहीचा सन्मान करतील, आणि आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी देतील, असा आशावाद जयंत पाटील यांनी व्यक्त केला. या १६२ आमदारांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५१ आमदारांचा समावेश आहे. आता फक्त तीन आमदारांच्याच स्वाक्षरी आम्हाला मिळू शकलेल्या नाहीत. यांत स्वतः अजित पवार, अण्णा बनसोड आणि आत्राम या तिघांचा समावेश आहे. आत्राम यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. ते लवकरच आमच्याकडे येतील. बनसोड हे सुद्धा येतील, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली शपथ लोकशाहीची पायमल्ली आहे. आम्ही सरकार बनवतोय अशी राज्यपालांकडे मागणी केली होती. आम्ही वेळ मागितली होती. पण त्यावेळी राज्यपालांनी ती फेटाळून लावली होती. पण फडणवीस यांना मात्र पुरेशी संधी दिली जात आहे. हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. आज आम्ही १६२ आमदारांच्या बहुमताच्या पाठिंब्याचे पत्र दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहीजे.

– एकनाथ शिंदे, शिवसेना विधीमंडळ गट नेते

आमच्याकडे १६२ आमदार आहेत. राज्यपालांसमोर आम्ही या सगळ्या आमदारांना समोर आणायला तयार आहोत

– बाळासाहेब थोरात, काँग्रेस विधीमंडळ गट नेते

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते अजित पवार आहेत. राष्ट्रवादीने दिलेल्या पत्राला कायदेशीर मान्यता नाही. आमदारांना शमविण्यासाठी हे पत्र दिलेले आहे. अनेक आमदार असंतुष्ट आहेत. हे पत्र दिशाभूल करणारे आहे. – आशिष शेलार, भाजप नेते

रामराजे निंबाळकरांच्या दालनात अजित पवारांसोबत राष्ट्रवादीची खलबते

भाजपच्या घोटात सामील झालेले अजित पवार यांना स्वगृही आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नेटाने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात आज अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खलबते केली. यावेळी निंबाळकर यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आदी नेते उपस्थित होते. आज कै. यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चव्हाणांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर फडणवीस अन्य ठिकाणी निघून गेले, तर अजित पवार मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत बराच वेळ मागे थांबले होते.

हे सुद्धा वाचा

खळबळजनक : भाजपने लपविलेले पाच आमदार कडक पहारा फोडून शरद पवारांनी आणले परत

शरद पवार म्हणाले, अजित पवारांना माझा छुपा पाठिंबा सुद्धा नाही

भाजपला तूर्त दिलासा : न्यायालय उद्या निकाल देणार

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शिवाजी महाराजांचा केला एकेरी उल्लेख, भाजपचे ‘हे’ खासदार संतापले

तुषार खरात

Recent Posts

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

19 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

19 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

20 hours ago

गूळ आणि ओवा एकत्र करून खाल्ल्याने बरे होणार अनेक आजार, जाणून घ्या

बदलत्या ऋतूमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, पण…

21 hours ago

Jaykumar Gore Vs Ranjit Deshmukh | रणजीत देशमुख निवडणूक लढविणार का ? | रोखठोक मुलाखत

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit…

22 hours ago

Prithviraj Chavan Vs Atul Bhosle | सरकारने काळजी घेतली तर तरूण मुलंही म्हशी पाळतील

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(If the…

23 hours ago