टीम लय भारी
मुंबई : बेस्ट कर्मचा-यांसह, पोलीस दलात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांनाही कोरोनाने घेरले आहे. एसटी महामंडळातील मुंबई, ठाणे, पनवेलमधील २३ कर्मचारी कोरोनाबाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरु आहे. विशेष म्हणजे मार्च, एप्रिल, मे महिन्यापर्यंत एसटीत एकही करोनाचा रुग्ण नसल्याचे सांगितले जात होते; परंतु जून महिन्यात करोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या २४ झाली आहे. कुर्ला, नेहरूनगरमधील १०, ठाणे विभागातील ४, पालघरमधील दोन, विद्याविहार कार्यालयातील एक, विद्याविहार कार्यशाळेतील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.
एसटीच्या मुंबई सेन्ट्रल मुख्यालयातील एक वरिष्ठ अधिकाऱ्यालाही करोना झाला आहे. मुख्यालयातील आणखी तीन अधिकाऱ्यांची चाचणी घेण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झालेल्या कर्मचाऱ्यांचा आढावा अद्याप घेण्यात आलेला नाही. एसटीच्या विविध विभागातील वरिष्ठांकडून कर्मचाऱ्यांची काळजी घेतली जात आहे. अशीही माहिती एसटीच्या अधिका-यांकडून देण्यात आली आहे.
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…