आदित्य ठाकरेंनी वाढदिवशी केले पुण्याचे काम

टीम लय भारी

मुंबई :  कोरोनाच्या संकटात युवासेना प्रमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी एका सहा दिवसांच्या अर्भकाला मोठी मदत केली आहे. जन्मतःच हृदयात तीन ब्लॉक असलेल्या सहा दिवसांच्या अर्भकाच्या उपचारांसाठी ठाकरेंनी एक लाखाची मदत केली आहे. नवजात बाळाच्या पित्याकडे मदत सुपूर्द केली. आदित्य ठाकरेंच्या या माणूसकी धर्मामुळे सर्वत्र त्यांचे कौतूक केले जात आहे.

घणसोलीमध्ये राहणाऱ्या अब्दुल अंसारी यांच्या नवजात बाळाच्या हृदयात जन्मतःच तीन ब्लॉकेज होते. मुलुंडमधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये सहा दिवसाच्या अर्भकाची जीवन-मृत्यूशी झुंज सुरु आहे. बाळाच्या हृदयात 3 ब्लॉकेज आणि एक छिद्र होते. ऐरोलीच्या मनपा रुग्णालयात जन्माला आलेल्या बाळाच्या जीवाला जन्मापासूनच धोका असल्याचं सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं. त्याला नेरुळच्या मंगल प्रभू रुग्णालयात पाठवण्यात आलं. त्याच्या प्रकृतीत काही सुधारणा न झाल्याने अब्दुल आपल्या मुलाला मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात घेऊन आला.

 

बाळाच्या वडिलांकडे उपचार करुन घेण्यासाठी पैसे नव्हते. त्रस्त पित्याने अनेकांकडे मदतीची याचना केली. युवासेना कार्यकर्त्याला याविषयी माहिती मिळाल्याने त्याने पित्याची व्यथा आदित्य ठाकरेंपर्यंत पोहोचवली.

यापुढे येणाऱ्या उपचाराचा सर्व खर्चही आदित्य ठाकरे उचलणार….

आदित्य ठाकरे यांनी राहुल कनल आणि हुसैन शाह या कार्यकर्त्याच्या माध्यमातून अब्दुल अंसारी यांच्याकडे एक लाखाची मदत सुपूर्द केली. इतकंच नाही, तर यापुढे येणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याचं आश्वासनही दिलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

अब्दुल अंसारी यांनी मानले आभार…

आदित्य ठाकरे हे मदतीला धावून आल्यामुळे बाळाचे वडिल अब्दुल अंसारी यांनी आदित्य ठाकरेंचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

 

 

राजीक खान

Recent Posts

तुम्ही पण कडक पाणी वापरता का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच

कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…

12 hours ago

आता ऑफिसमध्ये बसून देखील करू शकता व्यायाम, जाणून घ्या

व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…

14 hours ago

साइड एल्बो प्लँक व्यायामाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…

15 hours ago

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

1 day ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

1 day ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

2 days ago