अजित पवारांच्या नव्या दाव्याने खळबळ : मी राष्ट्रवादीतच, शरद पवार आपले नेते

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, आणि राष्ट्रवादीमध्येच राहणार आहे. शरद पवार हेच आपले नेते आहेत. भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी पुढील पाच वर्षे स्थिर सरकार देईल, आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आणि जनतेसाठी काम करेल. कोणतीही काळजी करायची गरज नाही. सर्व काही ठीक होईल. थोडा धीर धरा. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे. या ट्विटमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील व दिलीप वळसे पाटील दुपारी अजित पवार यांना भेटायला गेले होते. दोन तास या नेत्यांनी अजित पवार यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु अजित पवारांनी माघार घेतली नाही. त्यानंतर त्यांनी हे ट्विट केले आहे. असे ट्विट करण्यामागे दोन कारणे असतील असे बोलले जात आहे. शरद पवार यांच्या सोबत गेलेले काही आमदार विधानसभेत आपल्या बाजूने मतदान करतील असे अजितदादांना वाटत असेल. या आमदारांना योग्य तो संदेश द्यावा, या आमदारांचा विचार बदलू नये म्हणून अजितदादांनी हे ट्विट केले असावे असे बोलले जात आहे. दुसरे कारण असेही सांगितले जात आहे की, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे विधीमंडळ नेते अजित पवार की जयंत पाटील असा कायदेशीर मुद्दा उपस्थित झाला आहे. आपण खरे विधीमंडळ नेते असल्याचे अजित पवार यांना दाखवून द्यायचे असावे. जेणेकरून विधानसभेतील मतदानासाठी काढावयाच्या संभाव्य व्हीपसाठी कायदेशीर बाजू आपल्या सोयीची होऊ शकेल असे अजितदादांना चित्र तयार करायचे असेल.

अजित पवाराना एकटे पाडण्याचे प्रयत्न

दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी अजितदादांना पुरते एकटे पाडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अजित पवारांबरोबर गेलेल्या एकेका आमदाराला त्यांनी आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले आहे. आज शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी हॉटेल रेनेसॉंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत आपलेच सरकार येणार असल्याचे शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी सगळ्या आमदारांना सांगितले आहे.

अजित पवारांच्या ट्विटमुळे जनतेमध्येही संभ्रम

अजित पवार यांनी ट्विटमध्ये आपले नेते शरद पवार हेच आहेत. राज्यात काँग्रेस व एनसीपीचे सरकार पाच वर्षे सत्तेत टिकेल असे नमूद केले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या पाठिंब्यानेच आपण भाजपसोबत आलो आहोत, असे दाखविण्याचा प्रयत्नही अजित पवार यांनी केला आहे. शरद पवारांचीच मान्यता असल्याचे भासवून लोकांमध्ये संभ्रम उडवून द्यावा असाही अजित पवार यांचा हेतू असू शकेल असे सूत्रांचे म्हणणे आहे.

अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष माहित नाही – जितेंद्र आव्हाड

अजित पवार भाजपमध्ये गेले आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवारांनी भूमिका जाहीर केली आहे. अजितदादांना गटनेतेपदावरून बाजूला केलेले आहे. भाजप हा जात्यांध पक्ष आहे. त्या पक्षासोबत जायचे नाही अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. त्यामुळे अजित पवार कोणत्या राष्ट्रवादी पक्षात आहेत ते मला माहित नाही. आमचा राष्ट्रवादी पक्ष एकसंध आहे, व तो शरद पवार यांच्या पाठीशी ठाम उभा आहे, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

हे सुद्ध वाचा

पुतण्या रोहितची काका अजितदादाला साद : परत या, परत या

चोरून केलेलं काम कोणतं, हे शिवसेनेनं आम्हाला शिकवू नये : आशिष शेलार

न्यायालयाची टिप्पणी : राज्यपाल अशा पद्धतीने कुणालाही शपथ देऊ शकत नाहीत

तुषार खरात

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

5 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

6 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

7 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

10 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

11 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

13 hours ago