टॉप न्यूज

Alert : आयपीएल सामन्यात ऑनलाइन बेटींग खेळताना सावधान!

आयपीएल हंगामात बेटिंगची जोरदार ‘बॅटिंग’, अॅप आणि ऑनलाइन गेमच्या माध्यमातून अल्पवयीन मुलेही आघाडीवर

टीम लय भारी

मुंबई : कोरोना संकटामुळे यंदा आयपीएलचे क्रिकेट सामने दुबईमध्ये होत असले तरी भारतातील वातावरण क्रिकेटमय झाले आहे. क्रिकेटवर ऑनलाइन जुगार अर्थात बेटिंगही जोरात सुरू आहे. विविध अॅप आणि ऑनलाइन गेमच्या माध्यमातून बेटिंग केले जात असून अल्पवयीन मुलेही यामध्ये अडकले आहेत. संघ निवड, उत्कृष्ट खेळाडू निवड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरातींमुळे अनेकजण याकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष (Alert) द्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आयपीएलचा हंगाम सुरू झाल्यापासून टीव्हीवर यासंदर्भातील अॅप, ऑनलाइन गेम यांच्या जाहिराती वाढल्या आहेत. या जाहिराती तरुणांना विशेष करून शाळा आणि कॉलेजांतील विद्यार्थ्यांना सहज आकर्षित करून घेत आहेत. आधीच क्रिकेटचे वेड आणि त्यात या जाहिराती पाहून विरंगुळ्यासोबतच झटपट कमाईचे माध्यम म्हणून याकडे पाहिले जात आहे.

अगदी नाममात्र शुल्क भरून क्रिकेटशी संबंधित ऑनलाइन गेममध्ये सहभागी होता येते. मोबाइलमध्ये डाउनलोड केल्यावर कुठेही न जाता घरातच बसून खेळता येते. क्रिकेटच्या अगदी छोट्या छोट्या बाबींवर बोली लावली जाते. जिंकणारा संघ, उत्कृष्ट खेळाडू, धावसंख्या, सर्वाधिक गडी बाद करणारा खेळाडू अशा अनेक मुद्द्यांवर खेळ खेळला जातो. प्रत्येक टप्प्यावर खेळणा-याला बक्षिसाचे अमिष दाखवले जाते. मात्र निवडलेल्या संघातील खेळाडू प्रत्यक्ष सामन्यात काय कामगिरी करतात त्यावर बक्षीस अवलंबून असते. ब-याचदा सुरुवातीला जिंकल्यानंतर याकडे अधिक आकर्षित होतात. अशा बेटिंगमध्ये नंतर पैसे कसे जातात हे कळत नाही.

अनेकदा ज्या मोबाइलद्वारे अॅप, ऑनलाइन गेमवरून जुगार खेळला जातो, तोच मोबाइल क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असतो. खेळण्याच्या नादात अनेकदा पैसे भरताना बँक खात्याचा तपशील भरला जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास खात्यामधील पैसे परस्पर वळविले जाण्याची भीती असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.

पूर्वी बुकी फोनद्वारे सट्टा स्वीकारत. मात्र आता या बुकींनी आपला मोर्चा अॅप, ऑनलाइन गेमकडे वळविला आहे. या बहुतांश ऑनलाइन अॅप, गेमचे सर्व्हर परदेशात असतात. त्यामुळे एखादी फसवणुकीची तक्रार आलीच तर पोलिसांना तिथपर्यंत पोहोचण्यात मर्यादा येतात. काही वेळा या साखळीतील एखादा पोलिसांच्या तावडीत सापडतो, मात्र सूत्रधार मोकाटच राहतो.

अभिषेक सावंत

Recent Posts

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole )…

2 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

2 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

5 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

5 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

5 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

5 hours ago