टॉप न्यूज

अर्णब गोस्वामींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

टीम लय भारी

अलिबाग l रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी फिरोज शेख आणि नितेश सारडा यांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. (Arnab Goswami sent to judicial custody for 14 days)

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सकाळी मुंबई आणि रायगड पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली होती. यानंतर अर्णव गोस्वामी यांना अलिबाग येथे आणून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हापासून अर्णव यांच्या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. यादरम्यान अर्णव गोस्वामी यांना रुग्णालयात नेऊन त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.

अर्णब गोस्वामी यांनी दुपारच्या सत्रात अलिबाग पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचे आरोप केले होते. यावेळी त्यांनी माझ्या हाताला आणि पाठीला दुखापत झाल्याचेही अर्णव गोस्वामी यांनी म्हटले होते. मात्र, न्यायालयाने व्हिडीओ क्लीप आणि वैद्यकीय चाचणीचा अहवाल ग्राह्य धरत अर्णव गोस्वामी यांचे हे आरोप फेटाळून लावले.

याशिवाय, पोलिसांकडून अर्णव गोस्वामी यांची पत्नी आणि मुलाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा या दोघांवर आरोप ठेवण्यात आला आहे. बुधवारी सकाळी रायगड पोलिसांची टीम अर्णवच्या घरी त्याला अटक करण्यासाठी आली होती. त्यावेळी अर्णवला अटक करत असताना त्याची पत्नी आणि मुलाने पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्याला घेऊन जाऊ देत नव्हते. अर्णवला घेऊन जाण्यास त्यांनी मज्जाव केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजीक खान

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

2 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

2 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

3 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

3 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

3 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

5 hours ago