टॉप न्यूज

गोपीचंद पडळकर – शरद पवार वादाच्या पार्श्वभूमीवर अनिल गोटेंचे भाजपवर खळबळजनक आरोप

टीम लय भारी

मुंबई : शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आमदार गोपीचंद पडळकरांवर चौफेर टीका होत आहे. अशातच भाजपमधून बाहेर पडलेले धनगर नेते व राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत ( Anil Gote made serious allegation on BJP and RSS ).

भाजप व रा. स्व. संघातील जातीयवाद, महिलांच्या बाबतीतील अनैतिक प्रकार गोटे यांनी चव्हाट्यावर आणले आहेत. भाजपने बहुजन, मराठा व धनगर नेत्यांना कसे संपविले याचा इतिहासाच गोटे यांनी मांडला आहे. याबाबत गोटे यांनी पत्रकच जारी केले आहे ( Anil Gote slams to BJP ).

ब्राह्मण महिलेशी लग्न केले म्हणून मला भाजपने डावलले

संघ प्रचारकांनी आदिवासी महिलेशी अनैतिक संबंध ठेवून मुले जन्माला घातली

गोपीनाथ मुंडेंच्या घरातील कुणीही राजकारणात टिकू नये ही फडणवीस यांची इच्छा

अण्णा डांगेंपासून ते एकनाथ खडसे, उत्तमराव पाटील अशा अनेक बहुजनांना भाजपने संपविले

‘देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग आहे’ असे मी म्हणणार नाही

पडळकर यांना आमदार होवून जेमतेम आठ दिवस झाले आहेत.पण आमदारकीचा उपभोग घेण्याआधीच त्यांना नशा चढली आहे. भारतीय जनता पक्षाचा आणि पक्षातील उच्च वर्णियांच्या संकुचितपणाची अजुन त्यांना पुसटशी ओळख सुध्दा झाली नसल्याचा चिमटा गोटे यांनी काढला आहे.

गोटे पुढे म्हणतात की, भाजपच्या मनुवादी मनोवृत्तीचा मी प्रत्यक्ष बळी आहे. संघ, जनसंघ, भाजपा असा पन्नास वर्षाचा मी स्वत: अखंड प्रवास केला. काही घटना माझ्या समोर घडल्या आहेत. धनगर अथवा बहुजन भाजपामधील उच्चवर्णीयांच्या खिजगणतीला लागत नाहीत.

शेटजी, भटजीचा पक्ष म्हणून  देशाच्या राजकारणात जनसंघाला राजकीय अस्पृश्य मानले जात होते. १९५७ मध्ये जनसंघाचे दोन खासदार निवडून आले. स्व. अटलबिहारी वाजपेयी  आणि नानासाहेब उत्तमराव पाटील. जनसंघात येण्यापूर्वी नानासाहेबांच्या स्वत:च्या  मालकीच्या कार होत्या. एमए, एलएलएमपर्यंत शिक्षण झालेले गोल्ड मेडॅलिस्ट पाटील होते. फौजदारी वकील म्हणून ऐन तारुण्यातच भरपुर नाव कमवले होते.

हे सुद्धा वाचा

गोपीचंद पडळकर यांच्यावर धनगर नेतेही संतापले

गोपीचंद पडळकरांवर धनंजय मुंडेंनी साधला निशाणा, पवारांवरील टीकेचा घेतला समाचार

गोपीचंद पडळकरांना फडणवीस, मुनगंटीवार यांच्याकडून कानपिचक्या

आर्थिक सुबत्ता असलेल्या उत्तमराव पाटलांनी जनसंघात प्रवेश केला. अखेरच्या श्वासापर्यत‍ विचाराशी बांधीलकी कायम ठेवली. जनसंधाचे पुर्ण वेळ काम केले. आयुष्यभर कष्ट उपसून भटा शेटांचा पक्ष महाराष्ट्रात पोहचवला. आज मितीस धुळे शहरात नानासाहेबांचे स्वत:चे घर सुद्धा नाही.

आपल्या कुटूंबासाठी अर्जून रावजी वानखेडे, सुर्यभानजी वहाडणे यांनी कधी काही मागितले नाही. हीच गोष्ट मोतीरामजी लहाने, गजाननराव कोळी, बापुसाहेब कापकाते बहुजन समाजातील अशा असंख्य नेत्यांची रांगच्या राग आहे. भाजपाचे आजचे नेते कधी त्या भागात, त्या गावात कार्यक्रमाच्या, प्रचाराच्या निमित्ताने गेले तर, या दिवंगत नेत्यांच्या घरी पायधूळ झटकायचे सोडाच पण त्यांच्या स्मृतीस्थळावर चुकून सुध्दा जात नाहीत.

परिसरातील जुन्या नेत्यांचा नामोल्लेख करीत नाहीत. आजच्या भाजप नेत्यांना अशा नेत्यांचा नामोल्लेख करण्याचे सौजन्य आणि सामाजिक सभ्यतेचे भान सुद्धा शिल्ल्क राहिलेले नाही. रामभाऊ म्हाळगी हे सुध्दा पाटील यांच्या प्रमाणेच वकील होते.

त्यांनी आपला कसबा मतदार संघ सोडुन महाराष्ट्रातल्या एकाही जिल्ह्यात पक्ष प्रचारासाठी किंवा पक्ष कार्यासाठी एक तास सुद्धा दिला नाही. सकाळच्या डेक्कन क्विनने पुण्याहून मुंबईत यायचे आणि संध्याकाळच्या डेक्कन क्विनने परत पुण्यात  दाखल. एवढाच त्यांचा पक्षकार्यात सहभाग होता.

रामभाऊंप्रमाणे पक्षात खुप आमदार होते. रामभाऊंनी त्यांच्या उभ्या आयुष्यात पक्ष संघटनेचे एकही पद स्विकारले नाही. पद स्विकारले तर प्रचारासाठी कुटूंबापासून दूर जावे लागेल. पद स्विकारायला बहुजनांचे नेते आणि आरत्या ओवाळायला हे उच्च वर्णीय !

रामभाऊ महाळगींच्या नावाने पंचतारांकित म्हाळगी प्रबोधिनी काढली. पण एकाही बहुजन नेत्यांच्या नावाने साधे वसतिगृह सुध्दा बांधले नाही. वसंतराव भागवत हे ग्रेटच होते. त्यांच्या नावाने वसंतराव भागवत चौक, वसंत स्मृती स्थापन केली.

दु:ख हेच आहे की, ज्यांनी उभे आयुष्य केवळ आणि केवळ पक्षासाठी खर्ची घातले त्याचे चुकून स्मरणसुध्द कधी केले जात नाही. पण पक्षातील उच्च वर्णीय नेत्यांचे चीर काल यांनीच जनसंघाची मुहूर्त मेढ रोवली म्हणून टिकेल. स्व. गोपीनाथजी मुंडे साहेबांचे पाच वर्षात स्मारक होऊ दिले नाही. हे काही सहज घडले नाही. याच्या मागे योजनाबद्ध एक कुत्सीत विचार आहेत.

येणाऱ्या १० – २० वर्षात जनसंघाची ओळख म्हणजे रामभाऊ महाळगी, वसंतराव भागवत अथवा तत्सम उच्च वर्णीयांच्या नावानेच होईल.

संघ परिवारातील ब्राम्हण कुटूंबाच्या मुलीशी लग्न केले, म्हणून पक्ष कार्यातुन मला बाजुला करण्यात आले. अर्थात पक्षातील बहुजनांचे वरिष्ठ नेते माझ्या मागे खंबीर उभे राहीले. मी धनगर आणि माझी बायको ब्राह्मण हे उच्च वर्णीयांना सहन झाले नाही. पण ब्राह्मणांनी प्रचारक असतांना केलेले उद्योग अन् ब्रह्मचर्याचे प्रयोग बिनबोभाट पार पडले. संघाचे प्रचारक गोविंद पुर्णपात्रे यांनी एका आदिवासी महिलेशी संबंध ठेऊन त्यांना मुले झाली.

रामदास कळसकर यांचेही तसेच. उच्च वर्णीय समाजातील प्रचारकांनी अशा असंख्य भानगडी केल्या. त्यावर मात्र कुठलीही चर्चा नाही. एखादी घटना सर्वश्रृत होण्यापुर्वी असंख्य प्रकरणे दाबुन टाकली. बाहेर वाच्यता नाही. अशा एक ना अनेक प्रसंगाचा मी साक्षीदार आहे.

पडळकरांना भाजपच्या धोकेबाजीच्या झटका बसेल तेव्हाच शुध्दीवर येतील. माझ्यासकट नानाभाऊ कोकरे, अण्णासाहेब डांगे, प्रकाश शेंडगे हे धनगर नेते भाजपच्या जातीयवादाचे बळी आहेत.

कुत्सित विचारांचे, हलकट मनोवृत्तीचे, लबाडी व खोटे बोलण्याचे एकत्रित रुप म्हणजे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आहे. वस्तुत: प्रारंभीची अडीच, तीन वर्ष माझ्या बाजुने बरे सुरु होते. पण हे इतका हलक्या कानाचे कारस्थानी आहेत की, शकुनी मामा सुद्धा झक मारेल.

प्रारंभीच्या काळात नाथाभाऊ खडसे यांच्याविरुद्ध यांनी कारस्थान रचले. नाथाभाऊ दाऊदच्या बायकोशी फोनवर बोलतात इथपासून सुरु झालेले आरोप त्यांच्या कुटूंबापर्यत पोहोचवले. नाथाभाऊची चूक एवढीच की, त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. खानदेशातील मुख्यमंत्री व्हावा म्हणून आम्ही त्याचे समर्थक होतो.

मी जुन्या गोष्टी उगाच उगाळत बसत नाही. पण हेच गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर अमळनेर येथील सभेसाठी आले असता धुळ्याला भेटाले. त्या वेळला त्यांची धनगर आरक्षणाबद्दलची मते, देवेंद्र फडणवीसांबद्दलचे उद्गार त्याला फार काही दिवस लोटलेले नाहीत.

भाजपने एक विधान परिषद काय दिली. लगेच यांनी धाब्यावरुन मुतायला सुरवात केली. मी अनेकदा शरद पवारांवर टिका केली. गेली १० महिने मी त्यांच्या बरोबर काम करीत आहे. दिलेल्या शब्दाला जागणे, मनामध्ये कधीही द्वेष भावना मला तरी दिसुन आली नाही.

सागरा सारखे विशाल मन आणि समोरच्या व्यक्तीला सर्वोतोपरी मदत करण्याची तयारी  अनण्यसाधारण आहे. मी अनेकदा सांगितले की, शरद पवारांना टीका केल्याचा त्यांना कधी राग येत नाही. ते खुल्या दिलाने स्विकारतात. पण चॅलेंज केल तर मात्र सर्व शक्तीनिशी ते मोडून काढतात.

पडळकरांचा राजकारणातील अनुभव फारच तोकडा आहे. शरद पवार साहेबांना दुषणे देणे म्हणजे शिडी लावून उंटाचा मुका घेण्याचा प्रयत्न होय. शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची जेवढी संख्या राष्ट्रवादीत आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे किमान दुप्पट लोक अन्य पक्षात आहेत. त्यांच्याविरुध्द केलेल्या सहीची शाई वाळण्यापुर्वीच त्यांना कळालेल असत. याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे.

पडळकरांनी शरद पवारांना कोरोनाची उपमा दिली. यावरुन त्यांची राजकीय पात्रता, मनाची क्षुद्रता आणि विचारांची पातळी लक्षात येते. पवारांचे वय व अनुभव अन् राजकीय कारकिर्दीसमोर पडळकर डासा ऐवढेही नाहीत. डास मारायला कुणी बंदूक वापर नाही. एक हीटचा फवारा काफी असतो.

पडळकरांनी खुलासा करतांना ‘मी भावनेच्या भरात बोलुन गेलो’ असे म्हटले तरी सुध्दा याचा अर्थ असा होतो की, जे पोटात होते, तेच ओठावर आले. देवेंद्र फडणवीसांनी माझ्याशी केलेली धोकेबाजी, विश्वासघात तर जगजाहीर आहे. पण एकही धनगर विधानसभेत घेऊ नये यासाठी केलेली कारस्थाने डावपेच आणि प्रसंगी विरोधकांना बळ देण्याचे उद्योग मी जाणून आहे.

माझ्या मतदार संघात तर, “मुसलमान निवडून आला तरी चालेल. पण अनिल गोटे येता कामा नये” यासाठी पैशाचा महापूर आला होता. पण संतापामध्ये मी कधी फडणवीस “महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग” असे म्हणणार नाही.

वस्तुस्थिती असली तरी, तसे मी कधी बोलणार नाही. रोज रात्री १० नंतर वर्षा बंगल्यावर सार्वजनिक किंमत नसलेले चरित्र्यहीन लोकांना घेऊन बसायचे. आपल्याच पक्षातील नेत्यांविरुध्द करस्थाने करायची हे काही सुसंस्कृतपणाचे, सभ्यतेचे, मनाच्या दिलदार पणाचे अथवा संस्काराचे लक्षण नाही. अतिशय संकुचित, क्षुद्र आणि स्वार्थी स्वभाव हेच फडणवीस यांच्याबद्दल तूर्त सांगता येईल.

धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दलची ( Dhangar reservation ) माझी मते जगजाहीर आहेत. आज पर्यंत कुठल्याही राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळूच नये असा बंदोबस्त केला नव्हता. तो देवेंद्र फडणवीसांनी केला. Tata Institute Of Social Science या संस्थेकडून सर्वेक्षण करुन घेऊन गोड बोलुन पाच वर्ष झुलवत ठेवले. अखेर त्यांनी धनगरांच्या पाठीत खंजीर खुपसला.

त्यांनी अनेकांच्या पाठीत इतके खंजीर खुपसले की, गेल्या ५ वर्षात देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पाठीत खुपसण्यासाठी बाजारात एकही खंजीर शिल्लक ठेवला नाही. याची त्यांना पुरेपुर जाणीव असल्यामुळे ते खंजीराची भाषा करतात. पडळकर हे स्वत:च म्हणत होते “ जो धनगरांची औलाद असेल तो भाजपला मत देणार नाही ”  आता ते स्वत:च भाजपचे आमदार झाले त्यांनीच त्यांच्या या वक्तव्याचा ( Anil Gote says, Gopichand Padalkar must make clarification ) खुलासा करावा !

पडळकर नव्या नवरीचा आनंद उपभोगत आहेत. नवरी रुळल्यावर त्यांना झटके बसतील त्या वेळेला त्यांच्या बाजुला स्वत:ची सावलीसुध्दा राहणार नाही. माझ्या अनुभवाच्या जोरावर मी सांगतो आहे. स्व. गोपीनाथ मुंडेच्या कुंटूबातील कुणीही राजकारणात राहु नये. अशी हलकट, नीच आणि संकुचित बुद्धी फडणवीसांचीच असु शकते. हे फडणवीस काय ! आणि नानासाहेब फडणवीस काय ? दोघे सारखेच ( Anil Gote allegated, Devendra Fadnavis trying to damage Gopinath Munde’s family ) .

पडळकरांचा निषेध करावा एवढे मोठे त्यांचे व्यक्तिमत्व नाही. घृणास्पद निश्चितच आहे.  त्यांनी स्वत:च अशी परिस्थिती निर्माण केली असल्याचे गोटे यांनी पत्रकात म्हटले आहे.

तुषार खरात

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

8 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

8 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

9 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

9 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

10 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

12 hours ago