टॉप न्यूज

शेतकरी आंदोलनात भाजपच्या हस्तकांचा शिरकाव?

अतुल माने, जेष्ठ पत्रकार

नवी दिल्ली : गेली 34 दिवस नवी दिल्लीच्या चारी सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलनात आता भाजप (BJP) प्रणित काही शेतकरी घुसले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कृषी कायदे वीणा विलंब रद्द करण्यात यावेत यासाठी पंजाब, हरयाणा , उत्तर प्रदेश तसेच देशातील विविध राज्यातील शेतकरी गेल्या महिन्यापासून राजधानी च्या वेशीवर ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी तसेच त्यामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र मधून सुद्धा काहो शेतकरी आणि त्यांचे नेते गेले आहेत. यामध्ये संदीप गिड्डे आणि शंकर दरेकर हेही सहभागी आहेत. या दोघांनी आज राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आंदोलनाबाबत चर्चा केली.

यातील संदीप गिड्डे हे नाव भाजपशी संबंधित घेतले जाते. कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 1 जून 2017 ला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. हे आंदोलन त्यावेळी फडणवीस यांनी फोडण्यासाठी संदीप गिड्डे या आपल्या समर्थकाचा वापर केला होता. किमान हमीभाव आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी यासाठी मुंबई वगळता संपूर्ण राज्य बंद सुद्धा करण्यात आले होते. या आंदोलनाच्या सातव्या दिवशी जयराज सूर्यवंशी आणि संदीप गिड्डे यांच्याशी रात्री चर्चा करून फडणवीस यांनी या आंदोलनात फूट पाडली. गिड्डे आणि सूर्यवंशी यांनी हे आंदोलन समाप्त करत असल्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत केली. याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान मोर्चा, प्रहार संघटना या सर्वांनी गिड्डे हे मुख्यमंत्र्यांचे हस्तक असल्याचा आरोप करत आंदोलन पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

गिड्डे यांनी केवळ शेतकरी आंदोलन नव्हे तर मराठा मोर्चा आंदोलनात सुद्धा शिरकाव करून त्यात उभी फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता. कोणताही पदाधिकारी नसताना गिड्डे यांची ढवळाढवळ पाहून कोल्हापूर येथील एका सभेत त्यांना चोप देण्यात आला होता. त्यावेळी गिड्डे हे फडणवीस यांचे जवळचे हस्तक असल्याचा आरोप करण्यात आला होता.

आता नवी दिल्ली मधील आंदोलनात पुन्हा एकदा संदीप गिड्डे हे सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. आपण महाराष्ट्र चे प्रतिनिधित्व करत आहोत असे दाखवून त्यांनी शरद पवार यांची भेटही घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे आंदोलन मोडण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. त्याला जातीय तसेच धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न करण्यात आला . पण त्यात सरकार यशस्वी झाले नाही. मग आंदोलनात आपली लोक घुसवून ते कमजोर करण्याचा भाजपचा हा प्रयत्न तर नाही ना असा सवाल गिड्डे यांच्या उपस्थितीमुळे विचारला जात आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

9 mins ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम,फायबर, मॅग्नेशियम,…

42 mins ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

3 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

3 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

5 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

5 hours ago