टॉप न्यूज

बॉक्सर लव्हलिनाचा उपांत्य फेरीत प्रवेश, ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरे पदक केले निश्चित

टीम लय भारी

मुंबई :- भारताची युवा बॉक्सिर लव्हलिना बोर्गोहेन हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. काल झालेल्या महिलांच्या 69 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत लव्हलिना बोर्गोहेन हिने तैवानच्या निएन चिन चेन हिच्यावर एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला (Boxer Lovelina enters the semifinals).

लव्हलिनाने निन-चीनवर 4-1 ने मात करत ऑलिम्पिकमध्ये भारताचे पदक निश्चित केले आहे. उपांत्य फेरीत प्रवेशाने लवलीनाचे कांस्यपदक निश्चित झाले असले तरी आता उपांत्य आणि अंतिम फेरीच्या लढतींमधून चांगली कामगिरी करत पदकाचा रंग बदलण्याची संधी तिच्याकडे असेल. तसेच ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी लव्हलिना ही दुसरी महिला आणि एकूण तिसरी बॉक्सर ठरली आहे.

भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू क्वार्टर फायनलमध्ये धडकणार

तिरंदाजीत अतनू दासचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यावर मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

ऑलिम्पिकमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या लव्हलिना हिने तैवानच्या निएन चिन चेन हिच्याविरुद्ध झालेल्या लढतीत सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी केली. लवलिना हिने पहिल्या फेरीमध्ये तैवानच्या निएन चिन चेनचे आव्हान 3-2 अशा फरकाने परतवून लावले. त्यानंतर दुसऱ्या फेरीवरही लवलिना हिचाच वरचष्मा दिसून आला. तिने ही फेरी 5-0 अशी सहज जिंकत सामन्यावर आणि पदकावर कब्जा केला (Easily won the match and captured the medal).

याआधी 2012 मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरीकोम हिने भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते. मात्र यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये मेरीकोम हिला पदकाने हुलकावणी दिली. मात्र आता उपांत्य फेरीत विजय मिळवून मेरीकोम हिच्यापेक्षा चांगली कामगिरी करण्याची संधी लव्हलिना हिच्याकडे असेल.

‘भास्कर जाधव; तुला मंत्री बनवत नाहीत, म्हणून तू भूंकत राहिलायस’

Tokyo Olympics: Boxer Lovlina Borgohain Reaches Semis, Confirms 2nd Medal For India

बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन

तिरंदाजीत दीपिका कुमारीची उपांत्यपूर्व फेरीत धडक

भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी हिने टोकियो ऑलिम्पिकमधील महिला एकेरी गटात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दीपिका कुमारी हिने माजी विश्वविजेती रशियन ऑलिम्पिक समितीची तिरंदाज सेनिया पेरोव्हा हिचा रोमांचक शुटआऊटमध्ये पराभव करत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत पाच सेटनंतर दोन्ही तिरंदाजांमध्ये 5-5 अशी बरोबरी होती. त्यानंतर दीपिकाने या दबावाचा यशस्वीपणे सामना करत शूटऑफमध्ये परफेक्ट 10 स्कोअर केला आणि रियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदत विजेतीचे आव्हान परतवून लावले.

Rasika Jadhav

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

4 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

4 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

4 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago