टीम लय भारी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल बाबत मोठं विधानं केलं.“भारतानं हवाई दलात राफेल विमानं सामिल केली ही नक्कीच चांगली बाब आहे. १०० टक्के राफेलसाठी काँग्रेसनं पुढाकार घेतला होता. राफेलच्या ताफ्यात सामिल होण्यानं नक्कीच हवाई दलाची ताकद वाढेल. पण ते गेमचेंजर ठरणार नाही. पवारांच्या या वक्तव्यामुळे केंद्राकडून काय उत्तर मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारतानं ३६ राफेल विमानांसाठी फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनशी करार केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५ राफेल विमानं भारताला मिळाली आहेत. आज राफेल विमानं भारतात दाखल होणार आहे. राफेलच्या हवाई दलाच्या ताफ्यात सामिल होण्यानं चीनची चिंता वाढेल, असं वाटत नसल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
राफेलच्या येण्यानं चीनला त्याची काळजी वाटेल असं मला वाटत नाही…
आपण नक्कीच चीनसोबत असलेल्या तणावावर गंभींरपणे विचार करत आहोत. राफेलच्या येण्यानं चीनला कदाचित कोणतीही काळजी वाटणार नाही. ते आपल्यापासून खुप म्हणजे खुपच पुढच्या टप्प्यावर आहेत. आपल्यात आणि त्यांच्यात कोणत्याही प्रकारची तुलना करता येणार नाही,” असं शरद पवार यावेळी म्हणाले. “जर भारतानं सुरक्षेच्या दृष्टीनं १० गोष्टी केल्या तर चीन १ हजार गोष्टी करेल. चीन आणि भारतात एवढी तफावात आहे. राफेलच्या येण्यानं चीनला त्याची काळजी वाटेल असं मला वाटत नाही. असंही पवार म्हणाले. भारतानं राफेल हवाई दलात सामावून घेतलं आहे हे चांगलं आहे. त्यामुळे हवाई दलाची ताकद नक्कीच वाढणार आहे. असंही शरद पवार म्हणाले.
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…