टॉप न्यूज

टोकियो ऑलिम्पिकवर कोरोनाचे सावट; व्हिलेजमध्ये एक कोरोना संक्रमित

टीम लय भारी

टोकियो :- संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या आणि पुढच्या आठवड्यापासून सुरू होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसमोर मोठे संकट आले आहे. टोकियो ऑलिम्पिकवर कोरोनाचे सावट आहे. २३ जुलैपासून म्हणजेच स्पर्धा आठवड्यावर येऊन ठेपलेली असतानाच ऑलिम्पिक क्रीडानगरीत पहिला रुग्ण कोरोना संक्रमित आढळून आला आहे (Corona defeat at the Tokyo Olympics).

कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिक-२०२० स्पर्धेत करोना विषाणूने प्रवेश केला आहे. यामुळे खळबळ उडाली असून, या घटनेला आयोजकांनीही दुजारो दिला आहे. एक अधिकारी कोरोनाबाधित आढळून आला असून, त्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे. आयोजकांनी याबद्दल माहिती दिली आहे. टोकियोमध्ये २३ जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होईल. ८ ऑगस्टला स्पर्धेचा समारोप होईल.

चीनच्या मुद्यांवरून राहुल गांधींनी मोदींना लगावला खोचक टोला

ज्यांचे फोटो ट्रेंडिंगला असायचे, त्याच दानिश सिद्दीकीचा अफगाणिस्तानात गोळीबारात मृत्यू

टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धा पुढील आठवड्यापासून (२३ जुलै) सुरू होत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. यंदा ऑलिम्पिक स्पर्धा होत असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदाऱ्या घेण्यात आलेल्या आहेत. २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा चालणार असून, कोरोनाने ऑलिम्पिक स्पर्धेच्या दारावर थाप दिली आहे. स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे (Corona first patient has been found in the Olympic Village just before the start of the competition).

ऑलिम्पिक व्हिलेजमधील एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती टोक्यो ऑलिम्पिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी तोशीरो मुटो यांनी दिली. खेळांच्या आयोजनात सहभागी होण्यासाठी परदेशातून आलेला एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. गोपनीयतेचा हवाला देत त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीबद्दल माहिती दिली नाही. कोरोना महामारीचे संकट असल्याने टोकियो ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलण्यात आले. ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कठोर नियम करण्यात आले आहेत. त्यांनी क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे.

टोकियो ऑलिम्पिक

प्रणिती शिंदेंची मोदींवर बोचरी टीका; मोदी मीडियासमोर यायला घाबरतात

Tokyo Games: First COVID-19 Case Hits Olympic Village

कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे पुढील आठवड्यापासून सुरू होत असलेल्या स्पर्धेसाठी चिंतेचा विषय असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. “ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. चाचण्या केल्या जात असताना संसर्ग झालेला रुग्ण आढळून आला असून, हा पहिलाच रुग्ण आहे”, अशी माहिती टोकियो ऑलिम्पिक समितीचे प्रवक्ते मासा टाकाया यांनी दिली. ही माहिती देत असताना टाकाया यांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या देशाबद्दलची माहिती मात्र, गोपनीय ठेवली.

टोकियो ऑलिम्पिकसाठी शुक्रवारी नायजेरियाच्या खेळाडूंचे पथक नारिटा विमानतळावरून टोकियोला रवाना होणार होते. पथकातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या व्यक्तीला सौम्य लक्षणे होती, मात्र वय जास्त असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Rasika Jadhav

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

4 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

5 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

5 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

7 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

7 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

7 days ago