बापरे : आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण!

टीम लय भारी 

नवी दिल्ली :  दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर सुरु असताना धक्कादायक घटना घडली. चक्क दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाची लागण झाली आहे. सत्येंद्र जैन यांचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण यानंतर त्यांचा ताप वाढला होता. सत्येंद्र जैन यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसल्याने डॉक्टरांनी पुन्हा एकदा त्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. पुन्हा चाचणी केली असता दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकच दिल्ली प्रशासनामध्ये तसे आम आदमी पक्षामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना १५ जून अचानक श्वास घेताना त्रास होत होता. तसेच जास्त ताप आल्याच्या कारणामुऴे जैन यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्री त्यांना दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण अचानक कमी झाल्याचंही सांगण्यात आलं होतं. सत्येंद्र जैन यांनीच ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली होती. यावेळी त्यांची कोरोना चाचणी केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण दुसऱ्यांदा करण्यात आलेल्या चाचणीत त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे.

अमित शाह यांच्यासोबत बैठकीला लावली होती हजेरी…

आधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ताप आणि सर्दी असल्याने करोना चाचणी केली होती. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. महत्त्वाची बाब म्हणजे सत्येंद्र जैन यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया उपस्थित असणाऱ्या बैठकीला हजेरी लावली होती.त्यामुळे सर्व नेत्यांची चिंता वाढली आहे.

 

राजीक खान

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

2 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

2 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

3 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

4 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

4 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

6 hours ago