टॉप न्यूज

corona vaccine : अरे बापरे! कोरोना लस घेतलेल्या डॉक्टरचा १६ दिवसांनी मृत्यू झाला!

टीम लय भारी

वॉशिंग्टन : कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लसीकरण (corona vaccine) सुरू केले आहे. मात्र, लशीचे काही दुष्परिणाम समोर येत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.

पोर्तुगालमध्ये फायजरची कोरोना लस घेतलेल्या एका नर्सचा दोन दिवसानंतर मृत्यू झाला. तर मेक्सिकोमध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर डॉक्टर कार्ला पेरेझ या महिला डॉक्टरला अर्धांगवायूचा झटका आल्याची घटना ताजी असतानाच आता लस घेतल्यानंतर एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याची मिळालेल्या माहितीनुसार, मियामीतील डॉक्टर ग्रेगरी मायकल (५६) यांनी कोरोना लस घेतल्यानंतर १६ दिवसांनी त्यांचा मृ्त्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.

डॉक्टर ग्रेगरी मायकल यांनी फायजरची लस घेतली होती. त्यांची पत्नी हेइदी नेकेलमान यांनी सांगितले की, १८ डिसेंबर रोजी ग्रेगरी यांनी लस घेतली. त्याआधी त्यांची प्रकृती ठणठणीत होती. इतकेच नव्हे तर त्यांना कोणताही आजार नव्हता. लस घेतल्यानंतर ग्रेगरी यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे त्यांनी सांगितले.

डॉक्टर ग्रेगरी यांना रोगप्रतिकार क्षमतेशी निगडीत दुर्मिळ आजार झाल्यानंतर रविवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

कोरोनाच्या लशीमुळेच हा आजार झाला असल्याचा आरोप ग्रेगरी यांच्या पत्नीने केला आहे. हेईदी नेकेलमान यांनी ‘डेली मेल’ ला सांगितले की, डॉक्टर ग्रेगरी यांच्या मृत्यूचा थेट संबंध लशीसोबत आहे. लस घेतल्यानंतरच त्यांना आजार झाला आणि त्यांचा मृत्यू झाला असल्याचे हेईदी यांनी म्हटले.

हेईदी यांनी सांगितले की, डॉक्टर ग्रेगरी यांची प्रकृती चांगली होती. सिगरेट त्यांनी कधीच घेतली नाही. तर, एखाद्या वेळेस काही प्रमाणात मद्य घेत असत. दररोज व्यायामही करायचे असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, लशीमुळे डॉक्टर ग्रेगरी यांचा मृत्यू झाला असे आम्ही मानत नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. डॉक्टर ग्रेगरी यांच्या मृत्यूची चौकशी सुरू असल्याचे फायजरने सांगितले आहे.

लस घेतल्यानंतर ग्रेगरी यांच्या प्रकृतीत कोणताही साइड इफेक्ट आढळून आला नाही. तीन दिवसानंतर त्यांच्या शरीरावर लाल चट्टे पडले असल्याचे ग्रेगरी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी स्वत: माउंट सिनोई मेडिकल सेंटरमध्ये तपासणी केली. त्यावेळी त्यांच्या शरीरात प्लेटलेट्सची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्याचे दिसून आले.

दरम्यान, याआधीही पोर्तुगालमध्ये फायजरची कोरोना लस घेतल्याच्या दोन दिवसानंतर सोनिया असेवेदो (४१ वर्ष) या नर्सचा मृत्यू झाला. ही नर्स एका कर्करोग रुग्णालयात कार्यरत होती. त्याआधी मेक्सिकोमध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर डॉक्टर कार्ला पेरेझ या महिला डॉक्टरला अर्धांगवायूचा झटका आला. या प्रकरणी नेमका मृत्यू कोणत्या कारणाने झाला याची चौकशी व तपास सुरु आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

4 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

5 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

5 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

1 week ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

1 week ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

1 week ago