टॉप न्यूज

coronavirus : ब्रिटनपेक्षाही घातक कोरोना भारतात तयार होऊ शकतो

टीम लय भारी : अतुल माने, जेष्ठ पत्रकार

नवी दिल्ली : ज्याची भीती वाटत होती तेच अखेर झालं. भारतातही (india) ब्रिटनमधील (britain) नवा कोरोनाव्हायरस (coronavirus) पोहोचला. नव्या कोरोनाचे 6 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सर्वांच्या काळजात धस्सं झालं आहे. नवा कोरोनाव्हायरस संक्रमणाचा दर हा 60 टक्के आणि त्यापेक्षा जास्त आहे अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. पण भारतात ब्रिटनपेक्षाही घातक असा कोरोना तयार होऊ शकतो, अशी चिंताही व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारनं नव्या कोरोनाव्हायरसला रोखण्यासाठी धडपड सुरू केली आहे. व्हायरसबाबत अधिक माहिती घेऊन त्यावर नियंत्रणासाठी आणि उपचारासाठी आवश्यक ती पावलं उचलली जात आहेत. नव्या कोरोनाव्हायरसबाबत केंद्र सरकारनं पत्रकार परिषद घेतली. यात प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन, निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गवा सहभागी झाले.

व्हायरसच्या स्पाइक प्रोटिनमध्ये 17 बदल झाले आहेत. त्यापैकी 8 बदल खूप महत्त्वाचे आहेत. व्हायरसचा ज्या रिसेप्टरनं मानवी पेशीशी सोडला जातो तो नव्या कोरोनामध्ये अधिक मजबूत आहे, ज्यामुळे तो सहजरित्या संक्रमित होतो. नव्या कोरोना पसरण्याचा दर हा 60 टक्के आणि त्यापेक्षा जास्त आहे, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, “यूकेमध्ये गेल्या 24 तासांत 40,000 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत आणि ही इतर देशांसाठीही चिंतेची बाब आहे. ब्रिटनमधील कोरोनाचा स्ट्रेन अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळेच कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. कोरोनाच्या इतर रूपापेक्षा हा व्हायरस वेगानं पसरतो आहे.

“या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लस. कोरोनावरील सध्या उपलब्ध असलेल्या लशी यूके आणि आफ्रिकेतील नव्या कोरोनाशी लढण्यास सक्षम आहेत. व्हायरसच्या बदलामुळे लशीच्या प्रभावावर काहीही परिणाम होणार नाही. पण त्याला थोडा वेळ लागेल. आपल्याला संयम राखावा लागेल. यावर उपचारासाठी योग्य त्या थेरेपीचा वापर करायला हवा. नाहीतर हा व्हायरस आवाक्याबाहेर जाईल”, असं आयसीएमआरचे बलरामा भार्गवा यांनी सांगितलं,

“सुरुवातीलाच या व्हायरसवर नियंत्रण मिळवणं सोपं आहे. कदाचित भारतातही अधिक जीवघेण्या कोरोनाचं रूप येऊ शकतो. जो यापेक्षा जास्त घातक असेल”, असं सांगत निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सावध केलं आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

Eknath Shinde | Devendra Shinde | Jaykumar Gore | सरकार मयतीचे सामान सुद्धा देणार | Ladaki Bahin

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत. गेल्या सलग पाच वेळा ते…

1 hour ago

गर्भधारणेदरम्यान कोणते मीठ अधिक फायदेशीर आहे? जाणून घ्या

प्रत्येक जोडप्यासाठी गर्भधारणा हा एक सुंदर प्रवास असतो. गर्भधारणेच्या 9 महिन्यांच्या चक्रात महिलांच्या शरीरात अनेक…

2 hours ago

Sharad Pawar | Jaykumar Gore | शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या गावची कहाणी

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(The story of…

2 hours ago

Jaykumar Gore | उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी नसते

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे. मीच…

2 hours ago

निरोगी राहण्यासाठी नक्की खा हे सुपरफूड, जाणून घ्या

अन्न हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक अन्नामध्ये विशिष्ट प्रकारचे पोषक घटक आढळतात,…

3 hours ago

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

2 days ago