टॉप न्यूज

घरातही मास्क घालावा लागत आहे; दिल्लीतील प्रदूषणावरुन सरन्यायाधीशांनी केंद्र सरकारला फटकारले

टीम लय भारी

नवी दिल्ली: वायूप्रदूषणामुळे दिल्लीतील परिस्थिती बिकट होत चालली आहे. राजधानी दिल्ली दिवसेंदिवस गॅस चेंबर बनत चालली आहे. वायूप्रदूषणाचा धोका पाहता या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले आहे. प्रदूषणासाठी शेतकऱ्यांना शिव्या देणे ही एक फॅशन झाली आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे(Delhi is deteriorating due to air pollution)

प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी लॉकडाऊनची सूचनाही न्यायालयाने केली आहे. भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमण यांनी केंद्राला सांगितले की, वायू प्रदूषण ही एक गंभीर स्थिती आहे. आम्हाला घरीही मास्क लावावे लागतात.

शिवसेनेने कधीही ठरवून मुस्लिमांना विरोध केला नाही, आमच्या हिंदुत्वाच्या व्याखेत सर्व जातीधर्मांना स्थान: संजय राऊत

अमरावतीत बंदला हिंसक वळण; आक्रमक आंदोलकांची दगडफेक आणि तोडफोड,पोलिसां लाठीचार्ज!

वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय पावले उचलली आहेत, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला केला. दोन लाख यंत्रे शेतातील खुंट जाळण्यासाठी उपलब्ध आहेत तसेच बाजारात दोन तीन प्रकारच्या मशीन उपलब्ध आहेत. पण शेतकरी ती खरेदी करू शकत नाहीत. केंद्र/राज्य सरकारे शेतकऱ्यांना ही यंत्रे देऊन परत घेऊ शकत नाहीत का? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला केला.

“आम्हाला सांगा की आपण हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ५०० वरून किमान २०० अंकापर्यंत कसा कमी करू शकतो. काही आवश्यक उपाययोजना करा. तुम्ही दोन दिवसांच्या लॉकडाऊनचा किंवा कशाचाही विचार करू शकता? लोक कसे जगतील?” असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

लोकमान्य टिळकांचं ‘ते’ वाक्य कंगनाला तंतोतंत लागू पडतं; शिवसेनेचा टोला

Delhi CM calls emergency meeting to tackle air pollution

दिल्लीतील हवेची पातळी सर्वात खराब; वाहनांचा वापर कमी करण्याचा प्रदूषण मंडळाचा सल्ला

दिल्लीतील वायू प्रदूषणावरील याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, “लहान मुलांना या मोसमात शाळेत जावे लागते. आपण त्यांना धोक्यात घालत आहोत. देशाच्या राजधानीत तुम्ही सर्व शाळा उघडल्या आहेत आणि आता मुलांना प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. हे तुमचे अधिकार क्षेत्र आहे, केंद्राचे नाही.”

दरम्यान, धूर, धुके आणि मळभ या तिन्ही घटकांनी दिल्लीकरांना वेढले असून फुफ्फुसे निकामी करणाऱ्या ‘पीएम २.५’ या अत्यंत घातक धूलिकणांचे प्रमाण तब्बल ४०० मायक्रोग्रॅम्स प्रति घनमीटरवर पोहोचले आहे. ते निर्धारित मानकापेक्षा सहापट जास्त आहे.

दोन-तीन दिवसांपासून राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील किमान तापमान सुमारे १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने जमिनीलगत वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे हवेची गुणवत्ता आणखी खराब झालेली आहे. प्रदूषित हवेमुळे आकाशात तांबडे पट्टे दिसत असून कोंदट वातावरणामुळे श्वास कोंडू लागला आहे.

कीर्ती घाग

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 day ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

4 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

4 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

4 days ago