देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबतचे निर्देश

पुण्यामध्ये (Pune Porsche Accident) शनिवारी रात्री महागडी पोर्श गाडी बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्ट यांना धडक दिली. या धडकेत दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद पुण्यासह राज्यभर उमटताना दिसत आहे.देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आरोपींवर कठोर कारवाई ( Strict action against) करण्याबाबतचे निर्देश दिले. तसेच या प्रकरणात नवनवी माहिती रोज समोर येत आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, पुण्यातील नामांकित बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्रांसह अपघाताआधी दोन पबला भेटी दिल्या होत्या. त्यापैकी एका पबमध्ये ते ९० मिनिटे थांबले होते. केवळ दीड तासात अल्पवयीन चालक आणि त्याच्या मित्रांनी ४८ हजार रुपये उडवले होते.(Devendra Fadnavis and Pune Guardian Minister Ajit Pawar have directed to take strict action against the accused.)

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, अल्पवयीन चालक आणि त्याच्या मित्रांनी शनिवारी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी कोझी पबमध्ये प्रवेश केला होता. तिथे त्यांनी ९० मिनिटांत ४८ हजार रुपयांचे बिल केले. अमितेश कुमार यांनी वर्तमानपत्राला सांगितले की, आम्ही कोझी पबमधून ४८ हजारांचे बिल घेतले आहे. अल्पवयीन चालक आणि त्याच्या मित्रांनी कोणते मद्य घेतले त्यासाठी किती खर्च केले, याची माहिती आहे.

या प्रकरणात आम्ही आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेचे कलम ३०४ (अ) कलम दाखल केलेले नाही. तर ३०४ हे कलम लावले आहे. मद्यपान केल्यानंतर एका अरुंद रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवून इतरांच्या मृत्यूसाठी आपण कारणीभूत ठरू शकतो, हे माहीत असूनही सदर अल्पवयीन चालकाने हे कृत्य केले आहे. सहायक पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सागंतिले की, अल्पवयीन चालकाने दोन पबमध्ये जाऊन मित्रांसह मद्य रिचवले होते. त्यानंतर महागडी पोर्श कार चालवली. याबाबतचे सीसीटीव्ही चित्रण आमच्याकडे आहे. यामध्ये पबमध्ये आरोपी आणि त्याचे मित्र मद्य पिताना दिसत आहेत.
पुणे पोलिसांनी अल्पवयीन चालकाचे वडील आणि नामांकित बिल्डर विशाल अग्रवाल यांना अटक केली आहे. तसेच दोन्ही पबमधील तीन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. पबचालकांनी अल्पवयीन व्यक्तीला मद्य पुरविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, असे संकेत दिले आहेत. तसेच पोलीस महासंचालकांनीही आरोपींवर कारवाई करण्याबाबतचे निर्देश दिले असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.

टीम लय भारी

Recent Posts

आमचं सरकार आलं तर जरांगेंची मराठा आरक्षणची मागणी प्रथम पूर्ण करणार, जयंत पाटील

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकार त्यावर विचार करणार का?…

24 hours ago

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची स्ट्रॅटेजी तयार; देवेंद्र फडणवीस

राज्यात भाजपच्या आलेल्या कमी जागा ४८ पैकी ४५ हून अधिकचचा नारा देऊनही केवळ ९ जागांवर…

24 hours ago

कामगारांच्या आराेग्यासाठी इएसआयसीला महिन्याला १३ काेटी देऊनही कामगारांचे आराेग्य मात्र अधांतरीच

कामगारांच्या आराेग्यासाठी (workers health) उद्योजकवर्गाकडून इएसआयसीला महिन्याला १३ काेटी अर्थातच वर्षाला १५६ काेटी रूपये देऊनही…

1 day ago

रात्री एक वाजेपर्यत मित्रांसोबत पार्टी करणं महिला डॉक्टरच्या जीवावर बेतलं

मेडिकल कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून पडून महिला डॉक्टरचा मृत्यू (doctor's life) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली…

1 day ago

सातपूर आयटीआयच्या माजी प्राचार्यांचा कारनामा, बनावट बिले सादर करत केला लाखोंचा घोटाळा

सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालीन प्रभारी प्राचार्याने बनावट बिले सादर करुन लाखोंचा घोटाळा (duped)…

1 day ago

नाशिक येथे स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा

विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्यास भाग पाडून वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा करण्यास लावून अज्ञात…

1 day ago