टीम लय भारी
मुंबई : शिवसेना युवा नेते युवा सेनेचे प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त कोणीही मातोश्रीवर येऊ नये, तसेच, कुठेही गर्दी करू नये, तुम्ही आहात तिथूनच मला शुभेच्छा आणि आशीर्वाद द्या, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री दिशा पटानीनेही ट्विटरद्वारे खास शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे दिशा पटानी आणि आदित्य ठाकरे यांच्या मैत्रिच्या काही दिवसांपासून चर्चा असल्यामुळे या शुभेच्छांमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.
या दोघांना एकमेकांविषयी विचारले गेले प्रश्न, काय म्हणाली होती दिशा
आदित्य ठाकरे यांचं नाव अनेकदा दिशासोबत जोडलं गेलं आहे. हे दोघंही एकमेकांचे चांगले मित्र असून अनेकदा त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुलाखतींमध्येही अनेकदा या दोघांना एकमेकांविषयी प्रश्न विचारले गेले आहेत. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत दिशाने आदित्य ठाकरेंच्या मंत्रीपदावर प्रतिक्रिया दिली होती.
“आदित्य माझा चांगला मित्र आहे आणि त्याच्या कामावर मला खूप विश्वास आहे. सध्या देशाला एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आणि आदित्यसारखा तरुण नेता महाराष्ट्राला मिळाला ही खूपच चांगली गोष्टी आहे”, असं ती म्हणाली होती. आदित्य यांच्या कामाची स्तुती करत ती पुढे म्हणाली, “ते पर्यावरण संवर्धनासाठी बरंच काही करत आहेत. खास करून जंगल वाचवण्यासाठी त्यांनी चांगले पाऊल उचलले आहे. आता महाराष्ट्र सुरक्षित हातात आहे. त्यांनी मुंबईच्या नाइट लाइफला चालना दिली आहे. आता तुम्ही रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरु शकता, सिनेमा पाहू शकता. नाइट लाइफच्या संकल्पनेवर त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे.
कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…
व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…
आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…