पालघरमध्ये भूकंपाचे हादरे !

पालघर : पालघरमध्ये भूकंपाचे धक्के सुरुच असून पालघर जिल्हा आज पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरला. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे 4 वाजून 6 मिनिटांनी पालघरमध्ये डहाणू, कासा, तलासरी परिसरात भूकंपाचे धक्के बसले. काही ठिकाणी सौम्य स्वरुपाचे धक्के बसले. यामुळे परिसरात नागरिकांमध्ये पुन्हा भीती निर्माण झाली आहे.
दीड वर्षांपासून पालघरमध्ये सतत भूकंपाचे धक्के बसत आहे. शनिवारी पहाटे 4 वाजून 6 मिनिटांनी कासा ,चारोटी, पेठ,शिसने, आंबोली परिसरात भूकंपाचा धक्का बसला. हा धक्का सौम्य स्वरुपाचा असला तरी नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान शुक्रवारी 2.6, 2.0, 2.0, 2.4, 1.8, 1.9 रिस्टर स्केल क्षमतेचे 5 धक्के पालघरमध्ये बसल्याची नोंद करण्यात आली.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, कासा, तलासरी तालुक्यात भूकंपाचे सातत्याने धक्के बसत असतात. शुक्रवारी दिवसा आणि रात्री पालघरमध्ये जवळपास 5 सौम्य स्वरुपाचे धक्के जाणवले. तर शनिवारी पहाटेच्या सुमारात 2 धक्के बसल्याची नोंद गुजरात सिसमोलोस्टिक रिसर्च सेंटरने केली आहे.
तुषार खरात

Recent Posts

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

38 mins ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

57 mins ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

1 hour ago

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

4 hours ago

Sanjaymama Shinde यांच्या नावाने माढ्यातील ३६ गावांतील जनताही बोंब मारते | Vidhansabha 2024

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

4 hours ago

अजित पवार पळपुटे | शरद पवारांचा वारसा सुप्रिया सुळे, रोहित पवार चालवतील | Sanjaymama Shinde

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Sharad Pawar's legacy will be run…

4 hours ago