टॉप न्यूज

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यात घुसले फडणवीस आणि म्हणाले…

टीम लय भारी

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतरही अखेरपर्यंत हार पत्करण्यास तयार नसलेल्या डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एका हॉलीडे पार्टीमध्ये ‘मी पुन्हा येईन’ चा पुनरुच्चार केला. यामुळे येथे उपस्थित असलेल्या भारतीयांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) घुसले की काय, असा प्रश्न पडला.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. ब-याच वादानंतर ट्रम्प यांनी अखेर पराभव मान्य करत एका हॉलीडे रिसेप्शनचे आयोजन केले होते. या हॉलीडे पार्टीमध्ये आलेल्या पाहुण्यांना संबोधित करताना ट्रम्प यांनी चार वर्षांनंतर ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी तुमच्या भेटीला पुन्हा येईन’ असे म्हटले. या वाक्याने सर्वजण अचंबित झाले. कारण भारतात आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रात ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य चांगलेच चर्चेत आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या विधानावरुन ते पुन्हा एकदा 2024 ची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

डेमोक्रॅटिक पार्टीचे ज्यो बायडन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. ट्रम्प यांच्या पराभवाने तब्बल 128 वर्षे जुना विक्रमही मोडला आहे. यानंतर आता ट्रम्प यांनी एका हॉलीडे रिसेप्शनचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानावरुन ते पुन्हा एकदा 2024 ची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

हॉलीडे पार्टीमध्ये आलेल्या पाहुण्यांना संबोधित करताना ट्रम्प यांनी चार वर्षांनंतर पुन्हा मी तुमच्या भेटीला येईन असे म्हटले. त्यामुळे याच विधानाने ट्रम्प यांनी आता थेट 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरू केल्याची चर्चा रंगली आहे. ‘ही चार वर्षे खूपच छान होती’ असे देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळाबद्दल बोलताना म्हटले आहे. या पार्टीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय समितीमधील अनेक सदस्य उपस्थित होते.

अभिषेक सावंत

Share
Published by
अभिषेक सावंत

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

12 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

12 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

13 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

13 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

14 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

16 hours ago