सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी ‘या’ अभिनेत्रीवर गुन्हा दाखल

टीम लय भारी

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी आरोप प्रत्यारोप सुरु आहे. सीबीआय चौकशीची मागणीही सुरु आहे. दरम्यान सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sushant Singh Rajput’s Father Files FIR Against Actor Rhea Chakraborty)  सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल केला आहे. बिहारच्या पाटण्यातील राजीव नगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

रियाने सुशांतकडून पैसे घेतले आणि त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले,” असा आरोप सुशांतचे वडिल के. के. सिंह यांनी केला आहे. सध्या सुशांत सिंहच्या आत्महत्येचा मुंबई पोलीस तपास करत आहेत. मात्र मुंबई पोलिसांच्या तपासावर मला विश्वास नाही, असे सुशांतच्या वडिलांचे म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी पाटणा पोलिसांना याबाबतची चौकशी करण्याची विनंती केली आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहे. के.के. सिंह यांच्या तक्रारीनुसार, “रियाने सुशांतला फसवलं. तिने त्याच्याकडून पैसे घेतले. तसेच त्याला कुटुंबापासून पूर्णपणे वेगळे केले. त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले,” असे ते म्हणाले. या तक्रारीनुसार रियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटण्यातील राजीव नगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. रियावर आयपीसी 341, 342, 380, 406, 420, 306 हे कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सुशांतच्या आत्महत्येच्या चौकशीसाठी पाटणाचे पोलीस अधीक्षक उपेंद्र शर्मा यांनी राजीव नगरचे ठाण्याचे प्रभारी यांना मुख्य तपास अधिकारी बनवण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समितीला मुंबईत पाठवण्यात आले आहे. ही टीम मुंबई पोलिसांसोबत चौकशी करणार आहे.

रिया चक्रवर्तीची झाली होती नऊ तास चौकशी…

सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची गुरुवारी (18 जून) जवळपास नऊ तास चौकशी करण्यात आली होती. सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झालेल्या रियाचा जबाब रात्री जवळपास आठ वाजता संपला.

सुशांत सिंह राजपूतने केली होती राहत्या घरी आत्महत्या…

सुशांत सिंह राजपूत याने रविवारी (14 जून 2020) रोजी मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे.

राजीक खान

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

18 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

18 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

19 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

19 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

20 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

22 hours ago