टॉप न्यूज

Nokia ची लॅपटॉप सेगमेंटमध्ये एंट्री, Nokia PureBook X14 लाँच

Nokia नोकिया कंपनीने स्मार्टफोन्स आणि टीव्हीनंतर आता भारतात लॅपटॉपच्या सेगमेंटमध्ये पाऊल ठेवलंय. कंपनीने आपला पहिला लॅपटॉप Nokia PureBook X14 लाँच केला आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने  आज सोमवार १४ डिसेंबर Nokia PureBook X14 लॅपटॉप लाँच झाल्याची घोषणा केली

59,990 रुपये इतकी या लॅपटॉपची किंमत ठेवण्यात आली आहे. १८ डिसेंबरपासून Nokia PureBook X14 लॅपटॉपची बूकिंग सुरूवात होईल. जाणून घेऊया या लॅपटॉपची खासियत –

14 इंचाची फुल एचडी IPS डिस्प्ले

8GB DDR4 RAM आणि 512GB NVMe SSD सोबत येणाऱ्या या लॅपटॉपमध्ये इंटेल i5 10th Gen क्वॉड-कोर प्रोसेसर देण्यात आलं आहे. विंडोज 10 ओएस सोबत येणाऱ्या या लॅपटॉपमध्ये 14 इंचाची फुल एचडी IPS डिस्प्ले आहे.

डॉल्बी ऑडिओ सपोर्ट आणि शानदार ग्राफिक्स

Nokia PureBook X14 चं वजन 1.1 किलोग्राम असून केवळ 16.8mm जाडी असलेल्या या लॅपटॉपची डिझाइन स्लीक आहे. दमदार साउंडसाठी यामध्ये डॉल्बी ऑडिओ सपोर्ट आहे. तर, उत्तम ग्राफिक्ससाठी लॅपटॉपमध्ये तुम्हाला 1.1 Ghz टर्बो GPU सोबत इंटीग्रेटेड इंटेल UHD 620 ग्राफिक्स कार्ड मिळेल.

8 तासांची बॅटरी लाइफ आणि 65 वॉट चार्जिंग

हा लॅपटॉप एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 8 तासांचा बॅकअप देतो. लवकर बॅटरी चार्ज व्हावी यासाठी यामध्ये 65 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या लॅपटॉपमध्ये ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, युएसबी 3.1, युएसबी 2.0, सिंगल HDMI पोर्ट आणि एक RJ45 पोर्ट आहे.

लॅपटॉपमध्ये सिंगल ऑडियो आउट पोर्ट आणि एक माइक पोर्ट देखील आहे. दरम्यान, Xiaomi आणि Honor या दोन चिनी कंपन्यांनी अनुक्रमे जून आणि जुलै महिन्यात भारतातील आपला पहिला लॅपटॉप लाँच केला.

राजीक खान

Recent Posts

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

10 mins ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

2 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

2 hours ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

4 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

5 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

6 hours ago