टॉप न्यूज

भारताच्या माजी कर्णधाराचे २९व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

टीम लय भारी

नवी दिल्ली: क्रिकेट जगतातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारताच्या अंडर-१९ संघाचा माजी कर्णधार अवि बरोटचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. २९ वर्षीय अवि सौराष्ट्रकडून खेळत होता. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या निधनाची माहिती दिली (Former India captain dies of heart attack at 29).

अविने यावर्षी सय्यद मुश्ताक अली करंडकातही शानदार शतक झळकावले होते. या व्यतिरिक्त, तो २०१९-२० मध्ये रणजी करंडक जिंकलेल्या सौराष्ट्रच्या विजेत्या संघाचा भाग होता.

मीच फुल टाइल काँग्रेस अध्यक्ष, सोनिया गांधींनी त्या नेत्यांना ठणकावले!

नवाब मलिकांचा पुन्हा एकदा एनसीबीवर खळबळजनक आरोप

अवि बरोटची कारकीर्द

अवि बरोट यष्टीरक्षक फलंदाज होता. कधीकधी तो गोलंदाजीही करायचा. त्याने आपल्या कारकिर्दीत ३८ प्रथम श्रेणी सामने, ३८ लिस्ट ए सामने आणि २० स्थानिक टी-२० सामने खेळले. बरोटने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत एक शतक आणि नऊ अर्धशतकांच्या मदतीने १५४७ धावा केल्या होत्या. लिस्ट ए सामन्यांमध्ये ८ अर्धशतकांच्या मदतीने १०३० धावा केल्या गेल्या. बरोट टी-२० क्रिकेटचा स्फोटक खेळाडू होता. त्याने देशांतर्गत टी-२० मध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांच्या मदतीने ७१७ धावा केल्या. टी-२० मध्ये त्याचा स्ट्राइक रेट १४६ आणि सरासरी ३८च्या आसपास होती.

अवि बरोट

संभाजी भिडे यांनी माफी मागावी, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Mumbai News Updates: Colleges in Maharashtra to reopen from October 20

२०१९-२०च्या हंगामात जेव्हा बंगालचा पराभव करून सौराष्ट्रने रणजी करंडक विजेतेपद पटकावले, तेव्हा अवि बरोट संघाचा एक भाग होता. याशिवाय, बरोट दोन वेळा रणजी ट्रॉफी फायनल देखील खेळला आहे. २०१५-१६मध्ये सौराष्ट्राला मुंबईने आणि २०१८-१९मध्ये अंतिम सामन्यात विदर्भाला पराभूत केले होते. दोन्ही वेळा अवि या संघाचा भाग होता.

२०१०-११ कूचबिहार करंडकात गुजरातसाठी चार शतके आणि तीन अर्धशतके ठोकल्याबद्दल बरोटला बीसीसीआयने अंडर-१९ क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कारही दिला होता. २०२०-२१च्या हंगामात, बरोटने सौराष्ट्रसाठी विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक करंडक स्पर्धेत भाग घेतला. त्याने गोव्याविरुद्ध टी-२० क्रिकेटचे एकमेव शतकही झळकावले. या सामन्यात, बरोटने फक्त ५३ चेंडूत १२२ धावा केल्या, ज्यात ११ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता.

कीर्ती घाग

Recent Posts

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole )…

6 mins ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

24 mins ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

3 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

3 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

3 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

4 hours ago