महाराष्ट्र सरकारने केला Break The Chain नियमावलीमध्ये नव्या बदलांचा समावेश!

टीम लय भारी

मुंबई : गेल्या आठवड्यात राज्य सरकारने जाहीर केलेल्या Break The Chain नियमावलीमध्ये काही नव्या बदलांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये RTPCR चाचणी सक्तीची करण्यासंदर्भातल्या नियमाप्रमाणेच इतर काही नियमांमध्ये केलेल्या बदलांचा समावेश आहे. या बदलांमुळे सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. तसेच, आपलं सरकार सेवा केंद्र, सेतू, सीएससी अशा एक खिडकी सेवा शनिवार-रविवार वगळता आठवड्याच्या इतर दिवशी सुरू ठेवण्याची परवानगी देखील नव्या बदलांनुसार देण्यात आली आहे.

RTPCT ऐवजी अँटिजेनला परवानगी!

सार्वजनिक वाहतूक, खासगी वाहतूक, चित्रपटांचं चित्रीकरण, मालिकांचं चित्रीकरण, जाहिरात, होम डिलीवरी करणारे कर्मचारी, परीक्षा घेणारे कर्मचारी, विवाहस्थळी असणारे कर्मचारी, स्मशानभूमीतील कर्मचारी, खाद्यपदार्थांचे विक्रेते, उत्पादन क्षेत्रातले कर्मचारी, इ-कॉमर्स क्षेत्रातले कर्मचारी, परवानगी असलेल्या बांधकाम क्षेत्रातले कर्मचारी, बँकिंग क्षेत्रातले कर्मचारी यांना RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. मात्र, ९ एप्रिल रोजी काढलेल्या शासकीय परिपत्रकानुसार या कर्मचाऱ्यांना RTPCR चाचणीऐवजी अँटिजेन चाचणी करण्याची मुभा देण्यता आली आहे.

एक खिडकी सेवा सुरू

आपलं सरकार सेवा केंद्र, SETU, CSC केंद्र, SETU केंद्र, पासपोर्ट सेवा केंद्र अशा सरकारच्या एक खिडकी सेवांना शनिवार-रविवार वगळता आठवड्याचे इतर दिवस सकाळी ७ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय, वर्तमानपत्रांसोबतच मासिके, जर्नल्स आणि नियतकालिकांचा देखील अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

ब्रेक दि चेन : आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे

 

राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक दि चेन अंतर्गत विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे.

१. डी मार्ट, रिलायंस, बिग बाजार सारखे मॉल्स उघडे राहणार का ?

४ आणि ५ एप्रिल रोजी राज्य शासनाने निर्बंधांबाबत आदेश काढले आहेत. जी दुकाने, मॉल्स यातील आवश्यक / जीवनावश्यक वस्तू विक्री करीत आहेत ते सुपर मार्केट्स, मॉल्स सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरु राहू शकतील. आवश्यक नसलेल्या वस्तूंचे विभाग बंद राहतील

२. आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच्या (विकेंड) लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहील आणि काय बंद ?

ब्रेक दि चेनच्या आदेशात म्हटल्याप्रमाणे आवश्यक सेवा सुरु राहतील. कोणताही व्यक्ती योग्य कारणांशिवाय फिरू शकणार नाही. ही कारणे आदेशात नमूद आहेत.

३. आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच्या (विकेंड) लॉकडाऊमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरु राहतील काय ?

कोविडसंदर्भातील सर्व आरोग्याचे नियम पाळून सुरु राहू शकतील. मात्र नियमांचे पालन होत नाही हे लक्षात आले तर स्थानिक राज्य शासनाची परवानगी घेऊन बाजार बंद करू शकतात. स्थानिक प्रशासनाने यासंदर्भात काटेकोर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे

४. बांधकाम दुकाने उघडी राहतील का ?

बांधकाम साहित्याची दुकाने बंद राहतील

५. वाहनांची दुरुस्ती करणारे गॅरेजेस, ऑटोमोबाईल दुकाने उघडी राहतील का ?

वाहतूक सुरु असल्याने दुरुस्ती करणारी गॅरेजेस सुरु राहू शकतील. मात्र, त्यांनी कोविडविषयक आरोग्याच्या नियमांचे पालन करायचे आहे. याच्याशी संबंधित दुकाने मात्र बंद राहतील. कोविड नियम न पाळणारी गॅरेजेस कोविड संसर्ग असेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.

६. केंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना (पीएसयू) आवश्यक सेवा म्हणून संबोधता येतील का ?

नाही. सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पीएसयू हे आवश्यक सेवेत येत नाहीत. आवश्यक सेवेत समाविष्ट असणारेच केंद्र शासनाचे विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील या सेवेतील समजले जातील.

७. नागरिक मद्य खरेदी करू शकतात का ?

हो. नागरिक हे ४ एप्रिल रोजी उपाहारगृहे आणि बारसाठी काढलेल्या आदेशाप्रमाणे निर्धारित वेळेत बारमधून टेक अवे पद्धतीने किंवा होमडिलिव्हरीने मद्य खरेदी करू शकतात.

८. मद्यविक्री दुकान सुरु राहू शकतील का ? होम डिलिव्हरी होऊ शकेल का ?

नाही.

९. रस्त्याकडेचा ढाबा सुरु राहू शकतो का ?

हो. पण उपाहारगृहांप्रमाणेच बसून जेवण करण्यास परवानगी नाही. पार्सल नेऊ शकतात.

१०. इलेक्ट्रिक उपकरणांची दुकाने (एसी, फ्रीज इत्यादी) सुरु राहू शकतील का?

नाही.

११.दूरसंचारशी सबंधित (डेस्कटॉप, मोबाईल इत्यादी) सुरु राहू शकतील ?

नाही.

१२. आपले सरकार, सेतू केंद्रे सुरु राहू शकतील ?

हो. आठवड्याच्या दिवशी (विक डेज) सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहू शकतात.

१३. आठवड्याच्या शेवटी रात्री ८ नंतर किंवा सकाळी ७ च्या आत उपाहारगृहे होम डिलिव्हरी करू शकतात का ?

आठवड्याच्या नियमित दिवशी ग्राहक उपाहारगृहांतून सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत पार्सल घेऊन जाऊ शकतात. या निर्धारित वेळेनंतर तसेच आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत (विकेंड) ग्राहक पार्सल घेऊ शकणार नाही. मात्र ई कॉमर्समार्फत तसेच उपहारगृहातून होम डिलिव्हरीमार्फत खाद्यपदार्थ मागवता येईल.

अभिषेक सावंत

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

57 mins ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

1 hour ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

2 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

3 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

3 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

5 hours ago