टॉप न्यूज

Happy birthday to Sharad Pawar : शरद पवारांच्या वाढदिवशी दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव

टीम लय भारी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज 80वा वाढदिवस. (Happy birthday to Sharad Pawar) राजकारणातला बाप माणूस म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. शरद पवार यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. 80व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यांच्यावर तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सर्वशक्तिमान देव शरद पवारांना दीर्घायु्ष्य देवो, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यांना चांगले आरोग्य लाभो, असेही मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

शरद पवार साहेबांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडेंची राज्यातील 29 लाख दिव्यांगांना अनोखी भेट

देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त (Sharad Pawars 80th birthday) राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील 29 लाख पेक्षा जास्त असलेल्या दिव्यांग व्यक्तींना एक अनोखी भेट दिली आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयमार्फत दिव्यांग व्यक्तींना विविध सहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाशरद’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म ‘ओएलएक्स’ अॅपच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे.

शरद पवारांच्या वाढदिवसानिमीत्त राष्ट्रवादीकडून बळीराजा कृतज्ञता दिनाचे आयोजन

 

आज पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने बळीराजा कृतज्ञता दिन साजरा केला जात आहे. 80 व्या वर्षात पदार्पण करत असल्याने शेतक-यांसाठी कृतज्ञता कोष तयार करुन 80 लाखांचा कोष सुपुर्द केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ८०व्या वर्षात पदार्पण करीत असून, त्यांचा हा वाढदिवस बळिराजा कृतज्ञता दिवस म्हणून राज्यभरात साजरा होणार आहे. यासाठी ‘राष्ट्रवादी’च्या वतीने ८० लाख रुपयांचा बळिराजा कृतज्ञता कोश तयार करण्यात आला आहे. हा जमा झालेला निधी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीने नुकसानग्रस्त शेतक-यांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे.

राज्याच्या व देशाच्या राजकारणात सलग पन्नास वर्षे सक्रिय असलेले शरद पवार आज ८०व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराचे केंद्रस्थान बनलेल्या पवार यांना ८०व्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते व चाहते मुंबईत दाखल होत आहेत. पवार यांचा हा ८०वा वाढदिवस बळिराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. युवक काँग्रेसच्या वतीने ‘परिवर्तनाचा महानेता’ या विषयावर वक्‍तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. शिवाय संपूर्ण मुंबईतील रुग्णालयात फळवाटप केले जाणार आहे. मुंबई युवकांच्या वतीने सर्व रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे.

शुभेच्छांचे लक्षवेधी फलक

शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात भव्य शुभेच्छा फलक लावले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरही पवार यांच्या शुभेच्छांचे लक्षवेधी फलक झळकले आहेत.

अभिषेक सावंत

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

2 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

2 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

4 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

4 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

4 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

6 hours ago