टॉप न्यूज

मुंबई इंडियन्स पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन

टीम लय भारी

दुबई l आयपीएलची फायनल मॅच मुंबई इंडियन्सने पाच विकेट राखून जिंकली. या विजयामुळे मुंबई इंडियन्सची टीम पाचव्यांदाच आयपीएल चॅम्पियन झाली.

आयपीएलच्या फायनल मॅचमध्ये टॉस जिंकून दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीने २० ओव्हरमध्ये ७ बाद १५६ धावा केल्या आणि मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) १५७ धावांचे आव्हान दिले.

मुंबई इंडियन्सने १८.४ ओव्हरमध्ये पाच बाद १५७ धावा करुन मॅच पाच विकेट राखून जिंकली. कॅप्टन रोहित शर्माने ६८ धावा, इशान किशनने नाबाद ३३ धावा, क्विंटन डी कॉकने २० धावा, सूर्यकुमार यादवने १९ धावा, कायरन पोलार्डने ९ धावा, हार्दिक पांड्याने ३ धावा आणि कृणाल पांड्याने नाबाद १ धाव अशी कामगिरी केली.

दिल्ली कॅपिटल्सच्या एनरिच नोर्टजेने रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याला बाद केले. मार्कस स्टोइनिसने क्विंटन डी कॉकला आणि कगिसो रबाडाने कायरन पोलार्डला बाद केले. सूर्यकुमार यादव धावचीत झाला.

याआधी प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सच्या श्रेयस अय्यरने नाबाद ६५ धावा, रिषभ पंतने ५६ धावा, शिखर धवनने १५ धावा, अक्षर पटेलने ९ धावा, शिमरॉन हेटमायरने ५ धावा, अजिंक्य रहाणेने २ धावा अशी कामगिरी केली.

कगिसो रबाडा एकही चेंडू न खेळता शून्य धावांवर धावचीत झाला. मार्कस स्टोइनिस शून्य धावा करुन बाद झाला. दिल्लीने २० ओव्हरमध्ये ७ बाद १५६ धावा केल्या. मुंबई इंडियन्सच्या ट्रेंट बोल्टने मार्कस स्टोइनिस, अजिंक्य रहाणे आणि शिमरॉन हेटमायर या तीन फलंदाजांना बाद केले. नॅथन कूल्टर नाइलने रिषभ पंत आणि अक्षर पटेलला बाद केले. जयंत यादवने शिखर धवनला बाद केले.

रोहित शर्माची कमाल, २००व्या आयपीेलमध्ये शानदार कामगिरी

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा कारकिर्दीतील २००वी आयपीएल मॅच खेळत होता. या मॅचमध्ये विजय मिळवून देत पाचव्यांचा स्वतःच्या नेतृत्वात मु्ंबई इंडियन्सला आयपीएल चॅम्पियन करणारा रोहित शर्मा हा आयपीएलच्या तेरा सीझनमधील सर्वाधिक यशस्वी कॅप्टन झाला.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या पाच आयपीएल स्पर्धा जिंकल्या. रोहित शर्माने मुंबई इंडियन्स या एकाच टीमकडून १५० पेक्षा जास्त मॅच खेळल्या आहेत. सातत्याने एकाच टीमकडून सर्वोत्तम खेळी करणारा रोहित शर्मा हा खऱ्या अर्थाने आयपीएल स्टार प्लेअर झाला. फायनलमध्ये कॅप्टनला साजेशी खेळी करणाऱ्या रोहितने अर्धशतक झळकावले. त्याने ६८ धावा केल्या.

राजीक खान

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

11 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

11 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

12 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

12 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

13 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

14 hours ago